नवीन मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 06:53 PM2020-08-16T18:53:07+5:302020-08-16T18:54:12+5:30
नाशिकरोड : नवीन मराठी शाळेत पंधरा आॅगस्ट स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला, मुख्याध्यापिका मंगला गोविंद यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नवीन मराठी शाळा, नाशिकरोड
नाशिकरोड : नवीन मराठी शाळेत पंधरा आॅगस्ट स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला,
मुख्याध्यापिका मंगला गोविंद यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी, सदस्य संजय खरोटे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रेवगडे, सदस्य कुंदन वाणी, सविता कुलकर्णी, शिक्षकवृंद उपस्थित होते. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, ध्वजगीत, समूहगीत सादर करण्यात आले.
आत्मनिर्भर भारत या संकल्पनातून विविध उद्दिष्ट्य पूर्तीची माहिती वंदना शहारे यांनी दिली. मंगला गोविंद यांनी कोरोनाला न घाबरता सर्वांनी सामना करून कोरोनासह जगण्याची तयारी करावी लागणार आहे. शाळा नाही शिक्षण सुरु या उद्देशाने सुरू असलेल्या आॅनलाईन अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच शाळा समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी यांनी एकतेचे महत्व विशारद केले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाहनाच्या निर्देशांचे पालन यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन सुनिता जाधव यांनी केले. (फोटो १६ सीटी)