नवीन रुग्ण, कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:19+5:302021-01-19T04:18:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येत सोमवारी (दि. १८) एकूण १४४ रुग्णांची भर पडली असून, १५० रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येत सोमवारी (दि. १८) एकूण १४४ रुग्णांची भर पडली असून, १५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, दोन बाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०३१ वर पोहाेचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार ८३० वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १० हजार ४९२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३०७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०७ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.५९, नाशिक ग्रामीण ९६.५०, मालेगाव शहरात ९३.३५, तर जिल्हाबाह्य ९४.९० असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ७० हजार ४३५ असून, त्यातील ३ लाख ५५ हजार २५० रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १३ हजार ८३० रुग्ण बाधित आढळून आले असून, १३५५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.