जिल्ह्यातील बाधितांसह नवीन रुग्ण समान पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 02:07 AM2020-12-22T02:07:05+5:302020-12-22T02:07:48+5:30
जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) एकूण ३५३ रुग्ण नवीन बाधित झाले असून, ३४७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४, नाशिक शहरात ३ तर जिल्हाबाह्य १ असे ८ जण दगावल्याने एकूण मृतांची संख्या १९१७ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) एकूण ३५३ रुग्ण नवीन बाधित झाले असून, ३४७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४, नाशिक शहरात ३ तर जिल्हाबाह्य १ असे ८ जण दगावल्याने एकूण मृतांची संख्या १९१७ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ५८६ वर पोहोचली असून, त्यातील १लाख २ हजार ९०४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर २७६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.६५ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.२३, नाशिक ग्रामीण ९४.७४, मालेगाव शहरात ९३.१३, तर जिल्हाबाह्य ९४.६१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २७६५ बाधित रुग्णांमध्ये १७११ रुग्ण नाशिक शहरात, ९११ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १३७ रुग्ण मालेगावमध्ये, तर ६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख १४ हजार ३५८ असून, त्यातील तीन लाख ६ हजार ०८७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ७ हजार ५८६ रुग्ण बाधित आढळून आले असून, ६८५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
-----