राज्यात विज निर्मीतीचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:31+5:302021-03-08T04:15:31+5:30

नाशिक: उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व शेतीच्या ...

New peak of power generation in the state | राज्यात विज निर्मीतीचा नवा उच्चांक

राज्यात विज निर्मीतीचा नवा उच्चांक

Next

नाशिक: उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व शेतीच्या हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रविवारी (दि.७) मार्चला सकाळी सव्वाआठ वाजता आतापर्यंतची सर्वात उच्चांकी ८ हजार १०४ मेगावाट वीज निर्मिती झाली. याआधी २० मे २०१९ रोजी ७ हजार ६११ मेगावाट वीज निर्मिती झाली होती. त्या तुलनेत ४९३ मेगा वॅट जादा वीजनिर्मिती करुन मागील रेकॉर्ड ब्रेक केले आहे.अशी माहिती सुत्रांनी दिली.

यानिमित्ताने महानिर्मितीच्या सर्वच औष्णिक विद्युत केंद्रांची उल्लेखनिय होत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात काही संचांचा भारांक ९० टक्केपेक्षा अधिक आहे. त्यात भुसावळ युनिट चार ९४ टक्के, युनिट पाच ९८.९६ टक्के, चंद्रपूर युनिट आठ ९९.९४ टक्के, युनिट नऊ ९५.५५ टक्के, खापरखेडा युनिट तीन ९१.१६ टक्के, युनिट पाच ८९.९५ टक्के, पारस युनिट तीन ९५.४२ .टक्के, परळी युनिट सहा ९१.१६ टक्के, युनिट आठ ९४.४८ .टक्के यांचा समावेश आहे.

काही ठिकाणचे संच जुने व वकालबाह्य होत असले तरीही वीज उत्पादनात कमी नाहीत.अशीच कामगिरी असली तर महानिर्मितीचा सुवर्णकाळ पुन्हा येईल अशी खात्री तज्ञांनी दिली आहे.

इन्फो...

रविवारी झालेले विक्रमी उत्पादन असे

नाशिक- युनिट चार १७६, युनिट पाच १८५ अशी एकुण ३६१ मेगावाट.

कोराडी- युनिट सहा १८०, युनिट सात १४१, युनिट आठ ५४२, युनिट नऊ ५२१, युनिट दहा ५४२ अशी एकुण १९२५ मेगावाट.

खापरखेडा- युनिट एक १४३, युनिट दोन १५०, युनिट तीन १६६, युनिट चार १७५, युनिट पाच ४६३ अशी एकुण १०९८ मेगावाट.

पारस- युनिट तीन १२४, युनिट चार २२० अशी एकुण ३४३ मेगावाट.

परळी- युनिट सहा २३०, युनिट सात २३०, युनिट आठ २३० अशी एकुण ६८९ मेगावाट.

चंद्रपूर- युनिट तीन १३६, युनिट चार १३८, युनिट पाच ४०१, युनिट सहा ४०३, युनिट आठ ४८१, युनिट नऊ ४३६ अशी एकुण १९९५ मेगावाट.

भुसावळ- युनिट तीन १७१, युनिट चार ४५१, युनिट पाच ४७२ अशी एकुण १०९४ मेगावाट म्हणजेच थर्मल ग्रॉस ८१०४ अशी उच्चांकी वीज निर्मिती झाली आहे.

Web Title: New peak of power generation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.