उद्योजकतेवर नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:14 PM2020-08-08T23:14:50+5:302020-08-09T00:21:09+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच उद्योजकता या विषयावर नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. उद्योजकतेला वाव देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचे ध्येय समोर ठेवून विद्यापीठाने ‘डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठीचे धडे देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइजेस विभागाने आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया यांच्यासोबत करार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

विद्यापीठात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे संचालक मंडळ सदस्य मिलिंद कांबळे यांनी याबाबतच्या करारवर बुधवारी (दि.५) स्वाक्षऱ्या केल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइजेसच्या संचालिक डॉ. अपूर्वा पालकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम आदी उपस्थित होते. आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला व त्यांचे सहकारी एस. बी. सरीन आणि डॉ. सत्य रंजन आचार्य हे आॅनलाइनच्या माध्यमातून यावेळी उपस्थित होते.अभ्यासक्रमांचे संपूर्ण शिक्षण आॅनलाइनविद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेला पदव्युत्तर पदवीचा हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून, यात विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे शिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमांचे संपूर्ण शिक्षण आॅनलाइन असल्याची माहिती सेंटर आॅफ इनोवेशनच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली आहे.