क्रीडा नवीन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:10 AM2021-01-01T04:10:31+5:302021-01-01T04:10:31+5:30
नाशिकच्या मध्यभागी असलेले आणि रणजीपर्यंतचे अनेक सामने खेळले गेलेले गोल्फ क्लबच्या मैदानाचे नूतनीकरणाचे काम येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण होणार ...
नाशिकच्या मध्यभागी असलेले आणि रणजीपर्यंतचे अनेक सामने खेळले गेलेले गोल्फ क्लबच्या मैदानाचे नूतनीकरणाचे काम येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यात संपूर्ण मैदानाचे नूतनीकरणासह पॅव्हेलियनची दोन मजली इमारत तसेच कॉमेंट्री आणि कनेक्टीव्हीटीच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा, घड्याळाचा एक टॉवर असे सर्व काम पूर्णत्वास पोहोचले आहे. काही किरकोळ काम लवकरच पूर्ण करुन पुढील महिन्यापासून स्थानिक स्पर्धांसाठी हे मैदान उपलब्ध होऊ शकणार आहे.
-------------------------------------
सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकला क्रीडा संकुल
राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी इगतपुरी, निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य, चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण, पेठ, सटाणा या तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आली आहेत. तर सिन्नर, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वरला नवीन क्रीडा संकुलाची उभारणी सुरु असून ती क्रीडा संकुलदेखील नूतन वर्षात उभी राहणार आहेत.
------------------------