नवा पायंडा : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शाही स्नान’ नको, ‘अमृत स्नान’ म्हणा; महंत भक्तीचरणदास यांची माहिती

By संजय पाठक | Updated: March 22, 2025 17:38 IST2025-03-22T17:35:47+5:302025-03-22T17:38:58+5:30

‘शाही स्नाना’च्या ऐवजी ‘अमृत स्नान’ शब्द वापर करण्यात येईल, तर अन्य स्नानांसाठी ‘पर्व स्नान’ शब्द  वापरण्यात येईल असे मत वैष्णव आखाड्यांचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास यांनी केले. 

New step: Don't take 'royal bath' at Simhastha Kumbh Mela, take 'Amrit bath'; Information from Mahant Bhakti Charandas | नवा पायंडा : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शाही स्नान’ नको, ‘अमृत स्नान’ म्हणा; महंत भक्तीचरणदास यांची माहिती

नवा पायंडा : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शाही स्नान’ नको, ‘अमृत स्नान’ म्हणा; महंत भक्तीचरणदास यांची माहिती

-संजय पाठक, नाशिक
कुंभमेळ्यात होणाऱ्या स्नानांना ‘शाही स्नान’ का म्हणतात यावरून बराच खल चालला होता. हा फारसी आणि उर्दु शब्द होता तसेच अन्य अनेक आक्षेप घेण्यात आल्याने चर्चा झाल्याा हेात्या. मात्र, प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हा शब्द मोडीत काढीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘अमृत स्नान’ शब्द प्रचलित केला. तोच आता पुढे झाला आहे. ‘शाही स्नाना’च्या ऐवजी ‘अमृत स्नान’ शब्द वापर करण्यात येईल, तर अन्य स्नानांसाठी ‘पर्व स्नान’ शब्द  वापरण्यात येईल असे मत वैष्णव आखाड्यांचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आगामी कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना हे मत व्यक्त केले. त्याचबराेबर कुंभमेळा प्राधीकरण साकारण्याची भूमिका आग्रहाने मांडली.

प्रयागराज येथे कुंभमेळा प्राधीकरण साकारत आहे. मात्र, त्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी देखील तातडीने प्राधीकरण स्थापन करावे आणि त्यात आखाडा परिषदेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

नाशिकमध्ये ४५ दिवस थांबणार साधू महंत

नाशिकमध्ये २०२६ मध्ये धर्मध्वजारोहणाने कुंभपर्व सुरू हेाईल ते २८ महिने चालेल. याच दरम्यान आठ महिन्यांनी उज्जैन येथे कुंभमेळा भरेल. परंपरेप्रमाणे नाशिक आणि उज्जैन येथे वर्षभरातच कुंभमेळा भरतो.

त्याचप्रमाणे २०१४-१५ मध्ये कुंभमेळ्यात नाशिकमध्ये साधू महंत २० दिवस वास्तव्यास होते. यंदा मात्र अमृत स्नानाच्या तारखा (शाही स्नान) काहीशा लांब असल्याने आखाड्यांचे साधू महंत ४५ दिवस नाशिमकमध्ये वास्तव्यास असतील, असेही भक्तीचरणदास म्हणाले.

Web Title: New step: Don't take 'royal bath' at Simhastha Kumbh Mela, take 'Amrit bath'; Information from Mahant Bhakti Charandas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.