मानोरीत नवीन उन्हाळ कांदा सडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 09:32 PM2019-05-26T21:32:59+5:302019-05-26T21:33:30+5:30

मानोरी : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांची पाठ सोडण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिवसेंदिवस दिसून येत असून गत वर्षी साठवून ठेवलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याला कमी दराअभावी अनेक शेतकर्यांनी उकिरड्याचा, नांगरठीचा तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकून दिल्यानंतर चालू वर्षी देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवून ठेवलेला असून या साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची स्थिती दीड महिन्यातच बिकट झाली असून यंदाच्या वाढत्या उष्णता आणि दमट वातावरणामुळे कांदा चाळीतच सडण्यास सुरु वात झाली आहे.

The new summer onion began to rot | मानोरीत नवीन उन्हाळ कांदा सडण्यास सुरुवात

चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा सडू लागला असून हा सडलेला कांदा पावड्याने भरताना शेतकरी.

Next
ठळक मुद्देमानोरी : शेतकऱ्यांना दिलेले शेतमालाला हमी भावाचे आश्वासन पूर्ण होणार का?

मानोरी : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांची पाठ सोडण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिवसेंदिवस दिसून येत असून गत वर्षी साठवून ठेवलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याला कमी दराअभावी अनेक शेतकर्यांनी उकिरड्याचा, नांगरठीचा तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकून दिल्यानंतर चालू वर्षी देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवून ठेवलेला असून या साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची स्थिती दीड महिन्यातच बिकट झाली असून यंदाच्या वाढत्या उष्णता आणि दमट वातावरणामुळे कांदा चाळीतच सडण्यास सुरु वात झाली असून या कांद्याची सडण्याची स्थिती अतिशय बिकट झाली असून हातात पावडे घेऊन कांदा बाहेर काढण्याची वेळ येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी बाळासाहेब वावधाने यांच्यावर आली आहे.
कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून विक्र मी उत्पादन घेत असून या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असून दोन वर्षांपासून खर्च फिटने देखील आवाक्याबाहेर झालेले आहे. आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात यंदा येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, जळगाव नेऊर आदी परिसरात कांद्याला भाव मिळेल अशी आशा न बाळगता तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता असताना देखील उन्हाळ कांद्याची विक्र मी लागवड केली होती. हजारो रु पये खर्चून पाण्याच्या कमतरतेमुळे कांदा बारीक राहिला होता.
यंदा निवडणुकीची रणधुमाळी असल्याने नवीन उन्हाळ कांद्याला नक्कीच अच्छे दिन येणार अशी शेतकरी वर्गाला आशा लागून होती या पाशर््वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी आर्थिक उलाढाल करत उसनवारी करून का होईना नवीन कांदा चाळ तयार करून आपला कांदा साठवून ठेवला आहे.त्यात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचे स्त्रोत अल्पशा प्रमाणात असल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. मागील चार ते पाच मिहन्यापासून येवला तालुक्यात सरासरी तापमान ३५ अंश ते ४४ अंश दरम्यान राहिल्याने दमट वातावरण निर्माण झाल्याने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला मोकळी हवा न मिळाल्याने एक मिहन्यातच साठवून ठेवलेल्या कांद्याला उष्णतेचा परिणाम जानवल्याने कांदा सडण्यास सुरु वात झाली असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे मागील वर्षासारखी कांदा उत्पादक शेतकर्यांची दैनिय स्थिती निर्माण झाली असून सध्याचे उन्हाळ कांद्याचे दर सरासरी ७०० ते ८०० च्या दरम्यान असून या भावाने नवीन कांदा विकल्यास मागील वर्षासारखा खर्च देखील फिटणार नसल्याने अशीच उष्णता कायम राहिल्यास ज्या शेतकर्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक केली आहे त्या शेतकºयांच्या अडचणीत मोठी भर पडणार आहे. त्यात खरीप हंगाम तोंडावर आल्याने खरिपाच्या तयारी साठी भांडवल कसे उपलब्ध करायचे हा मोठा प्रश्न असून सध्या शेतकºयांची स्थिती म्हणजे इकडे आड अन तिकडे विहीर अशी गत निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक अनेक दिग्गज उमेदवारांनी आपल्या प्रचार दौर्यात शेतकरी वर्गाला संबोधित करताना अनेक आश्वासने दिली असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास कांद्याच्या दराचा प्रश्न तसेच शेतकºयांच्या सर्व शेतमालाला हमी देण्याचे महत्त्वाचे आश्वासन दिले असून हे आश्वासन सत्यात उतरणार की नाही अशी चर्चा पुन्हा शेतकरी वर्गात सुरू झाली आहे.
मागील एक मिहन्यापूर्वी मी बारा ट्रॅक्टर कांदा चाळीत साठवून ठेवला होता. खरीप हंगाम जवळ येऊ लागला असल्याने नवीन कांदे विकून भांडवल उपलब्ध करायचे असताना कांदे भरण्यासाठी चाळीत गेलो असता सडलेल्या कांद्याचा वास येऊ लागल्याने कांदा चाळ फोडून बघितली असता सुरु वातीलाच तीस क्विंटल च्या आसपास नवीन कांदा सडलेल्या अवस्थेत दिसून आला.
- बाळासाहेब वावधाने, शेतकरी.

Web Title: The new summer onion began to rot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा