नवीन विद्यापीठ कायद्याने कुलगुरूंना दिलासा

By admin | Published: May 12, 2017 05:52 PM2017-05-12T17:52:44+5:302017-05-12T17:52:44+5:30

वासुदेव गाडे : कुलगुरू सन्मान सोहळ्यास उत्तर देताना प्रतिपादन

New University law consults the Vice Chancellors | नवीन विद्यापीठ कायद्याने कुलगुरूंना दिलासा

नवीन विद्यापीठ कायद्याने कुलगुरूंना दिलासा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नवीन विद्यापीठ कायद्यामुळे कुलगुरूंवरील जबाबदाऱ्यांचे विकें द्रीकरण झाले असून, कुलगुरूंवर असलेल्या विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासोबतच प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे प्रमाण कमी होणार असून, प्र-कु लगुरूंना सर्व प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे कुलगुरूंना शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी ध्येयधोरण आखण्यासाठी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिक वेळ उपलब्ध होणार असल्याने विद्यापीठाचा प्रगती आलेख आणखी उंचविण्याच्या संधी असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी केले.
पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपक्रेंद्राच्या सभागृहात येथील विद्यार्थ्यांनी वासुदेव गाडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त कुलगुरू सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या सन्मान सोहळ्यास उत्तर देताना ते बोलत होते.

Web Title: New University law consults the Vice Chancellors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.