नव्या वर्षात पुन्हा महागणार घरे

By admin | Published: December 17, 2014 12:23 AM2014-12-17T00:23:48+5:302014-12-17T00:24:33+5:30

रेडिरेकनरची दरवाढ : सर्वसामान्यांना भुर्दंड; क्रेडाईचे पदाधिकारी आज खडसे यांना भेटणार

In the new year again expensive houses will be expensive | नव्या वर्षात पुन्हा महागणार घरे

नव्या वर्षात पुन्हा महागणार घरे

Next

नाशिक : गेल्यावर्षी रेडिरेकनर म्हणजेच जमिनीच्या सरकारी बाजार भावात झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना घर खरेदी आवाक्याबाहेर गेली, मात्र त्यात सुधारणा होण्याऐवजी पुन्हा एकदा नागरिकांना घरखरेदीसाठी आणखी भुर्दंड मोजावा लागणार आहे. येत्या १ जानेवारीपासून रेडिरेकनरमध्ये कमीत कमी वीस टक्के दरवाढ होण्याचे संकेत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही धास्तावले असून, ही दरवाढ रोखण्यासाठी क्रेडाईचे पदाधिकारी महसूलमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तातडीने नागपूर येथे बुधवारी रवाना होत आहेत.
चालू वर्षी १ जानेवारीपासून रेडिरेकनरची जी दरवाढ झाली. त्यावेळी जमीन खरेदी आणि विक्री महाग झाली. त्यावेळी ज्या भाजपाने नाशिकमध्ये रेडिरेकनरची होळी केली त्याच भाजपाची सत्ता आल्यानंतर ही दरवाढ रद्द तर झाली नाहीच, उलट आता दरवाढ करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असून, अच्छे दिन नेमके कोणाचे असा प्रश्न घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
नाशिक शहरातील जमिनींचे सरकारी दर जानेवारी महिन्यात तब्बल चाळीस टक्क््यांनी वाढविण्यात आले. काही पट्ट्यात ही वाढ तब्बल शंभर टक्के अधिक होती. तर फुटनोटमधील काही अजब तरतुदींचा विचार केला तर ही दरवाढ तब्बल दीडशे टक्क््यांची वाढ होत होती. बांधकाम व्यावसायिकांनी फुट नोटच्या अंमलबजावणीस स्थगिती आणली असली तरी आजमितीला अशा कायदेशीर तिढ्यामुळे तब्बल एक हजार सदनिका पडून असल्याचे क्रेडाईच्या सर्वेत निदर्शनास आले आहे. चालू वर्षी नागरिकांना दरवाढीमुळे घर खरेदी करता आली नव्हती. त्यामुळे आता तरी नवीन वर्षात घरांचे दर आटोक्यात राहतील अशी असलेली अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. नव्या वर्षातही रेडिरेकनरच्या दरात कमीत कमी वीस टक्के दरवाढ होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पुन्हा एकदा महागणार आहे. सदर प्रकाराचा अंदाज आल्यानंतर क्रेडाईने तातडीने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेण्याची तयारी केली असून, त्यानुसार सुरेश पाटील, राजीव ठक्कर, सुनील कोतवाल हे नागपूरला बुधवारी पोहोचणार आहे. या दरवाढी संदर्भात नाशिकमधील भाजपाचे आमदार आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the new year again expensive houses will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.