शहा विद्यालयात मानवी साखळीद्वारे नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:46 PM2018-12-31T18:46:25+5:302018-12-31T18:46:48+5:30

सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि अनोख्या मानवी साखळीद्वारे वेलकम २०१९ ही इंग्रजी अक्षरे मैदानावर तयार करून नववर्षाचे स्वागत केले.

 New year reception by human chain in Shah Vidyalaya | शहा विद्यालयात मानवी साखळीद्वारे नववर्षाचे स्वागत

 सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप मानवी साखळीद्वारे वेलकम २०१९ नववर्षाचे स्वागत केले.

Next

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि अनोख्या मानवी साखळीद्वारे वेलकम २०१९ ही इंग्रजी अक्षरे मैदानावर तयार करून नववर्षाचे स्वागत केले.
सदरच्या मानवी साखळीमध्ये २१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आखीव आणि रेखीव पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या या कवायतीतून अक्षरांना आकर्षकता निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला भावपूर्ण निरोप दिला. नव्यावर्षात मैत्री पूर्वक संबंध प्रस्थापित करून यश मिळवण्यासाठी संकल्प केला. यावेळी प्राचार्य सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य सुनील गडाख, संजय जाधव, सलीम चौधरी, रमेश रौदळ, नारायण वाघ, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रविंद्र कोकटे, बाळासाहेब कुमावत, राजेंद्र गवळी, नवनाथ पाटील, नितीन जगताप, बी. पी. गुरूळे, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, बरखा साळी, मेधा शुक्ल, विश्वनाथ ठोक, सुरेखा गरूळे, सचिन रानडे, सुनील तासकर, जगन शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

 

Web Title:  New year reception by human chain in Shah Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.