नववर्षानिमित्त विश्रामगडावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:42 PM2020-01-02T23:42:24+5:302020-01-02T23:42:54+5:30
इगतपुरी तालुक्यातील युवकांनी गड-किल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विश्रामगडावर स्वच्छता अभियान राबवत दीपोत्सव साजरा केला.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील युवकांनी गड-किल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विश्रामगडावर स्वच्छता अभियान राबवत दीपोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणीत राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील युवकांनी तीन वर्षापासून सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेत इतिहासकालीन गड, किल्ले, बुरु ज आदी ठिकाणी हा उपक्र म राबवत असून, याआधी देखील या युवकांनी विश्रामगड, शिवनेरी, सिंहगड आदी महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे धान्य कोठार, स्नानगृहे आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. तसेच गडावरील रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या खाली आणल्या. किल्ल्यांची साफसफाई झाल्यानंतर कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत उपक्र मात संदीप काजळे, ज्ञानेश्वर मोगल, संदीप बरकले, महेश मते, सुरेश मालुंजकर, गोविंद ढगे, किरण यंदे, किरण कातोरे, वैभव दातीर, योगेश लायरे, आकाश मालुंजकर, हरिष मते, राहुल राव, संदीप कातोरे, राजू बटाटे आदींसह अनेक युवक सहभागी झाले होते. युवकांनी संपूर्ण विश्रामगडाला हाराफुलांच्या माळांनी सजावट केली. त्यानंतर सायंकाळी तब्बल एक हजार पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इतिहासकालीन साक्ष देणारा विश्रामगड किल्ला येथे या तरु ण युवकांनी संपूर्ण किल्ल्याच्या परिसराची स्वच्छता करत दीपोत्सव साजरा करीत परिसर उजळून टाकला.