नवे ताटकळत : जुन्या पदाधिकाऱ्यांसमवेत सेना भवनात प्रवेश संपर्कप्रमुखांच्या भेटीवरही गटबाजीचे सावट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:01 AM2018-04-04T01:01:40+5:302018-04-04T01:01:40+5:30
नाशिक : महानगर शिवसेनेतील खांदेपालटानंतर पहिल्यांदाच नाशिक भेटीवर आलेले संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांच्या दौºयातही सेनेतील गटबाजी संपुष्टात आली नसल्याची चर्चा शिवसैनिकांत केली जात आहे
नाशिक : महानगर शिवसेनेतील खांदेपालटानंतर पहिल्यांदाच नाशिक भेटीवर आलेले संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांच्या दौºयातही सेनेतील गटबाजी संपुष्टात आली नसल्याची चर्चा शिवसैनिकांत केली जात असून, खुद्द चौधरी यांनी सेना भवनात येताना नवनियुक्त महानगरप्रमुखांच्या उपस्थितीत प्रवेश करणे अपेक्षित असताना त्यांनी मात्र जुन्या पदाधिकाºयांना घेऊन कार्यालय गाठल्यामुळे उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्या उपस्थितीत सायंकाळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबरोबरच दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. महानगर शिवसेनेत आठवडाभरापूर्वी करण्यात आलेल्या खांदेपालटानंतर पहिल्यांदाच संपर्कप्रमुख नाशिक शहराच्या दौºयावर आल्यामुळे खांदेपालटाबाबत त्यांची भूमिका काय? याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. गेल्या आठवड्यात अजय बोरस्ते यांची गच्छंती करून शहरात सचिन मराठे व महेश बडवे असे दोन महानगरप्रमुख नेमण्यात आले व त्याची घोषणा सामनामधून करण्यात आली होती. मराठे व बडवे यांच्या नियुक्तीनंतर जुन्या पदाधिकाºयांचा सेना भवनात वाढलेला वावर व लावली जात असलेली आवर्जून हजेरी पाहता सेनेचे उत्तर महाराष्टÑ संपर्कप्रमुख संजय राऊत यांच्या गटाची या नियुक्तीत सरशी झाल्याचे मानले जात होते. सेनेतील या खांदेपालटावर संपर्क प्रमुख चौधरी यांची कोणतीही प्रतिक्रिया न उमटल्याने त्यांची या नियुक्तीस सहमती होती किंवा नाही याविषयी सैैनिक साशंक असतानाच त्याचा अनुभव मंगळवारच्या बैठकीपूर्वीच अनेकांना आला. चौधरी यांच्या उपस्थितीत सेना भवनात बैठक असल्यामुळे त्याचा निरोप सर्व आजी-माजी पदाधिकाºयांना देण्यात आला असला तरी, खुद्द शासकीय विश्रामगृहावरून सेना कार्यालयात येताना चौधरी यांनी दोघा नवनियुक्त महानगरप्रमुखांच्या उपस्थितीत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात असताना प्रत्यक्षात जुन्या पदाधिकाºयांना घेऊन त्यांनी कार्यालयात प्रवेश केला व विशेष म्हणजे चौधरी यांच्याकडून विश्रामगृहावरून बोलावणे येईल अशा आशेवर असलेले दोन्ही नवनियुक्त महानगरप्रमुख वाट पाहत सेना कार्यालयातच बसून होते. त्यामुळे दोघा महानगरप्रमुखांनी संपर्कप्रमुखांना भेटण्याचा राजशिष्टाचार पाळला नाही की, संपर्कप्रमुखांनीच त्यांना दूर ठेवले याविषयी बैठकीनंतर जोरदार चर्चा रंगली होती.