पतीच्या व्हॉटसअपवर सॉरीचा मेसेज पाठवून नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:00 PM2019-01-01T17:00:54+5:302019-01-01T17:03:41+5:30

नाशिक : पतीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर मला माफ कराल काय व सॉरी असा संदेश पाठवून अवघ्या सात महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या सव्वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सातपूरजवळील तिरडशेतच्या भावले मळ्यात घडली़

Newly-married suicide by sending a message of gratitude to husband | पतीच्या व्हॉटसअपवर सॉरीचा मेसेज पाठवून नवविवाहितेची आत्महत्या

पतीच्या व्हॉटसअपवर सॉरीचा मेसेज पाठवून नवविवाहितेची आत्महत्या

Next
ठळक मुद्देतिरडशेतमधील घटना : सात महिन्यांपुर्वी विवाह सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

नाशिक : पतीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर मला माफ कराल काय व सॉरी असा संदेश पाठवून अवघ्या सात महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या सव्वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सातपूरजवळील तिरडशेतच्या भावले मळ्यात घडली़

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरडशेत येथील भावले मळ्यातील उमेश सुकदेव भावले (२९) यांचा मे २०१८ मध्ये निलिमा (२६) सोबत विवाह झाला होता़ सोमवारी सकाळी साअट वाजेच्या सुमारास उमेश भावले हे सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या हार्डवेअर दुकानात गेले होते़ सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी निलीमा हिने त्यांच्या मोबाईलवरील व्हॉटसअपवर मला त्रास होतो, मला माफ कराल काय व सॉरी असा मेसेज केला़

तेव्हा उमेश यांनी मेसेज करून त्रास करून घेऊ नकोमी लगेच घरी आलो असे सांगून पंधरा मिनिटात साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी पोहोचले असता त्यांचा बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता़ जोरजोरात आवाज देऊनहीे दरवाजा न उघडल्याने उमेश भावले याने भाऊ संदीप यास बोलावून दरवाजाच्या बिजागिरीचे स्क्रू खोलून पाहिले असता पत्नी निलिमा हिने बेडरुममधील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले़

दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे़


कौटुंबिक कलह
सात महिन्यांपुर्वीच उमेश व निलीमा यांचा विवाह झालेला होता़ घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून समोर आले असून निलीमा भावले हिच्या आत्महत्येचे निश्चित कारण समोर आलेले नाही़ तसेच याबाबत सखोल तपास करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल़
- राजेंद्र कुटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर

Web Title: Newly-married suicide by sending a message of gratitude to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.