दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 05:44 PM2019-02-20T17:44:41+5:302019-02-20T17:44:56+5:30
वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. यात्रेच्या दुसºया दिवशी सुमारे पन्नास हजार भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेतले. नवसपूर्तीसाठी तुरळक प्रमाणात बोकडांचा बळी देण्यात आला.

काल मंगळवारी माघ पौर्णिमा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवारी देवीचा वार असल्याने व पौर्णिमा असल्याने दिवसभर पौर्णिमा असल्याने भाविकांची गर्दी होती. नवसपूर्ती भाविकांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात वधगृहात बोकडबळी दिले होते.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सतीमाता व सामतदादा काठी व मुखवट्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी वडांगळी येथील आठवडे बाजार असल्याने परिसरातील स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. स्थानिक भाविकांनी नारळ व पेढे वाढवून नवसपूर्ती केली. महिलांना लोटांगण घालतांना दिसत होत्या.
लाल रंगाचे ध्वज घेऊन भाविक परतीच्या वाटेवर
राज्यभरातून आलेले बंजारा भाविक बुधवारी दुपारनंतर परतीच्या वाटेवर असल्याचे दिसून आले. बंजारा भाविक परतू लागल्यानंतर स्थानिक भाविकांनी सतीमाता व सामतदादा मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. आज सकाळपासून बंजारा भाविकांबरोबरच परिसरातील भाविकांनी नारळ वाढवून व लोटांगण घालत नवसपूर्ती केली. भाविकांची गर्दी ओसरु लागल्याने पोलीस बंदोबस्तही कमी करण्यात आला आहे.