दुसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:09 AM2018-07-18T02:09:00+5:302018-07-18T02:09:27+5:30

नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

The next day, the curfew continues | दुसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच

दुसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच

Next
ठळक मुद्देपावसाची उघडीप : सतर्कतेचा इशारा कायम

नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात २८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात ८४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल सुरगाणा ६०, इगतपुरी ५८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. तर त्र्यंबकेश्वर येथे २७ व आंबोली येथे सायंकाळपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आल्यामुळे गंगापूर धरण ७९ टक्के भरले आहे. परिणामी धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने सोमवारी सकाळपासून सोडण्यात येत असलेले पाणी मंगळवारीही कायम ठेवण्यात आले. गंगापूरमधून ९३०२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणातदेखील ७९ टक्के साठा झाल्यामुळे धरणातून १०६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. चणकापूरमधून ३०८५ व पुनदमधून ११९८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.
पावसाने मंगळवारी दुपारी उघडीप दिल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे मालेगाव, नांदगाव, बागलाण, चांदवड, देवळा, येवला व निफाड तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी येथे १४५ मिलिमीटर इतका विक्रमी नोंदविण्यात आला आहे. त्या खालोखाल पेठला १३६, त्र्यंबकला ११३, सुरगाणा ९४ व नाशिकला ६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: The next day, the curfew continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर