दुसऱ्या दिवशीही गोदाकाठ ठप्पच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:51 AM2018-06-03T00:51:29+5:302018-06-03T00:51:29+5:30
सायखेडा : शेतकºयांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम दुसºया दिवसापासून दिसू लागले आहेत. विविध मागण्यांसाठी गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे सायखेडा मार्केटमध्ये शुकशुकाट होता.
सायखेडा : शेतकºयांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम दुसºया दिवसापासून दिसू लागले आहेत. विविध मागण्यांसाठी गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे सायखेडा मार्केटमध्ये शुकशुकाट होता.
मागील वर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या गोदाकाठ भागातील शेतकºयांनी यंदादेखील कडकडीत बंद पाळला आहे. यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत एकाही शेतकºयाने आपला शेतमाल विक्र ीसाठी बाजार समितीत आणला नाही.
दूध उत्पादक शेतकºयांनी दूध संकलन केंद्रात न आणता घरीच ठेवले. त्यामुळे परिसरातील सर्व गावातील दूध संकलन केंदे्र बंद होती.
मुबलक पाणी, काळी कसदार जमीन यामुळे उन्हाळ्यातही गोदाकाठ भागात नगदी पिके घेतली जातात. परिसरात भाजीपाला, गाजर, मिरची, पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. सध्या शेतकरी शेतीमाल तोडणी करण्यात दंग आहे.संप काळात शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ असूनसुद्धा आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शेतकºयांनी आपल्या शेतमालावर पाणी सोडून स्वयंस्फूर्तीने संपात सहभाग घेतला आहे. या भागात अमूल, पंचमहाल, गोवर्धन, थोरात, पराग, वारणा, प्रभात आदींच्या दूध संकलन केंद्रांवर दुधाचे अल्प प्रमाणात संकलन झाले. नियमित सुमारे ४५ हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या डेअरी पॉवरमध्ये शुक्र वारी दोन हजार लिटर, शनिवारी तीन हजार लिटर दूध संकलन झाल्याने, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे भगवान सानप यांनी सांगितले.
शेतकºयांसह व्यावसायिकांनाही या संपाची झळ सहन करावी लागत आहे.मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने आहे तीच परिस्थिती आहे. त्यामुळे उद्रेक होण्याअगोदर सरकारने शेतकºयांचे प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावले उचलावीत.
- कैलास डेर्ले, शेतकरी