नागरिकांच्या प्रतिसादावरच पुढील निर्णय अवलंबून मुख्यमंत्री ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 01:44 AM2021-03-20T01:44:28+5:302021-03-20T01:47:22+5:30

करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दीवर नियंत्रण आणणारे आहेत.  या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित असून नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच  पुढील निर्णय घेतला जावा अशा सूचना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गतवेळेपेक्षा काेरोचे व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

The next decision depends on the response of the citizens, Chief Minister Thackeray | नागरिकांच्या प्रतिसादावरच पुढील निर्णय अवलंबून मुख्यमंत्री ठाकरे

ओझर विमानतळ येथे कोरोना आढावा बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. समवेत मुख्य सचिव सिताराम कुंटे,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदि.

Next
ठळक मुद्देओझर विमानतळावर घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

नाशिक : करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दीवर नियंत्रण आणणारे आहेत.  या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित असून नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच  पुढील निर्णय घेतला जावा अशा सूचना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गतवेळेपेक्षा काेरोचे व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 
नंदुरबार दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्री   ओझर विमानतळावर उतरले असता तेथे त्यांनी नाशिक जिल्ह्याचा काेरोना आढावा घेतला.  या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री  म्हणाले की, नागरिकांमध्ये लसीकरणाची जागृती वाढत आहे.  त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले.  गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष देण्याची गरज असून  विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना   ठाकरे यांनी पोलीस विभागाला केली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य सुविधा पुरेशा : जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटीलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट-ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी सर्व यंत्रणा  करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.  
 

Web Title: The next decision depends on the response of the citizens, Chief Minister Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.