मनमाड-इंदूर रेल्वे पाठोपाठ नाशिक-धुळे रेल्वेने जोडणार

By Admin | Published: November 17, 2016 10:53 PM2016-11-17T22:53:53+5:302016-11-17T22:50:38+5:30

मनमाड-इंदूर रेल्वे पाठोपाठ नाशिक-धुळे रेल्वेने जोडणार

Next to Manmad-Indore Railway will be connected by Nashik-Dhule Railway | मनमाड-इंदूर रेल्वे पाठोपाठ नाशिक-धुळे रेल्वेने जोडणार

मनमाड-इंदूर रेल्वे पाठोपाठ नाशिक-धुळे रेल्वेने जोडणार

googlenewsNext

मालेगाव : मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर पाठोपाठ आता नाशिक-मालेगाव-धुळे रेल्वे मार्ग निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कळविले आहे.
दिल्ली येथे डॉ. भामरे यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असता त्यावेळी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. भामरे यांनी धुळे व नाशिक ही शहरे देखील रेल्वे आणि रस्त्याने जोडण्याबाबत त्यांचे लक्ष वेधले. यावेळी गडकरी यांनी मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारतांनाच धुळे- नाशिक यांनाही रेल्वेद्वारे जोडण्याचा मानस व्यक्त केला. जे. एन. पिटी बंधाऱ्याच्या विकासाबरोबरच येथून होणाऱ्या वाहतुकीला सहाय्यभूत ठरेल असे ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्यात तयार केले जाणार आहे. निफाड तालुक्याच्या जवळपास हे ड्रायपोर्ट अर्थात जमिनीवरील बंदर साकारले जाणार असून तेथुन होणाऱ्या वाहतुकीला सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीचा रेल्वेमार्ग विकसीत करण्यात येणार आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारण्यासाठी रेल्वे मंत्रालयांबरोरच जहाज बांधणी मंत्रालय संयुक्त करार करुन निम्मा खर्च उचलणार आहे. याबरोबरच प्राथिमक टप्पे पूर्ण झाले आहेत. दोन्ही मंत्रालयांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Next to Manmad-Indore Railway will be connected by Nashik-Dhule Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.