पुढील वर्षी पालिकेला ‘अच्छे दिन’ ...उत्पन्नवाढीची अपेक्षा : आयुक्तांचे अंदाजपत्रक दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:18 AM2017-12-14T01:18:33+5:302017-12-14T01:20:52+5:30
नाशिक : वेगवेगळ्या कारणास्तव आर्थिक परिस्थितीशी झुंजणाºया नाशिक महापालिकेला २०१८ साल दिलासादायक ठरण्याची शक्यता असून, पुढील वर्षी उत्पन्नवाढीच्या अपेक्षेमुळे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. विविध बाजूंनी जमा होणाºया उत्पन्नाची बाजू लक्षात घेता आयुक्तांकडून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे सादर होणारे अंदाजपत्रक सुमारे दोन हजार कोटींवर जाऊन पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या २० डिसेंबरला होणाºया महासभेत ते सादर केले जाणार आहे.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने त्यात ३८९ कोटी रुपयांची भर घातल्याने अंदाजपत्रक १७९९.३० कोटींवर जाऊन पोहोचले होते. स्थायी समितीने महासभेला अंदाजपत्रक सादर केल्यानंतर महापौरांनी प्राप्त सूचना-पुढील वर्ष महत्त्वाचेसन २०१९ मध्ये महाराष्टÑ विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सन २०१८ हे वर्ष सत्ताधारी भाजपाच्या दृष्टीने विकासाचे वर्ष ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले असल्याने महापालिकेला वेगवेगळ्या स्तरावर अनुदाने प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी सुमारे ९५० कोटी रुपये प्राप्त होतील, तर अन्य उत्पन्नाच्या माध्यमातून सुमारे हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. उत्पन्नवाढीचे प्रतिबिंब आयुक्तांच्या अंदाजपत्रकात उमटण्याची शक्यता आहे.