पुढील वर्षीही नगरसेवकांना झिरो बजेट

By admin | Published: January 30, 2015 12:22 AM2015-01-30T00:22:15+5:302015-01-30T00:22:28+5:30

पुढील वर्षीही नगरसेवकांना झिरो बजेट

In the next year, the corporators will get zero budget | पुढील वर्षीही नगरसेवकांना झिरो बजेट

पुढील वर्षीही नगरसेवकांना झिरो बजेट

Next

नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाच कुंभमेळा आणि नेहरू अभियानातील कामांचा ३७० कोटी रुपयांचा बोजा पुढील आर्थिक वर्षात तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी नगरसेवकांच्या दृष्टीने झिरो बजेट असणार आहे.
मनपाकडून गेल्या दोन अडीच वर्षांपासून नागरी कामे होत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच आयुक्तांनी नगरसेवकांना वीस लाख रुपयांच्या निधीतच कामे बसवा असा आग्रह धरल्याने महासभेत त्याचे पडसाद उमटले. आयुक्तांनी पन्नास लाख रुपयांपर्यंतची कामे करण्याची अनुमती दिली असली तरी पालिकेची आर्थिक अवस्थ जर्जर असल्याने ही कामे केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला. पुढील आर्थिक वर्षातही वाटचाल बिकट दिसत आहे. महापालिकेचे चालू आर्थिक वर्षीचे अंदाजपत्रक ३०४३ कोटी रुपयांचे आहे, परंतु जानेवारी महिना उजाडला तरी केवळ ५७५ कोटी रुपये जमले आहेत. पुढील आर्थिक वर्षाचा विचार केला, तर कुंभमेळ्याच्या कामांसाठी १३५ कोटी, मुकणे धरणातून थेट पाइपलाइनव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी ११५ कोटी, तर नेहरू अभियानातील अन्य कामांचे दायित्व म्हणून ११० ते १२० कोटी रुपये लागणार आहेत. त्याचा विचार केला, तर ३७० कोटी रुपयांचे दायित्व आत्ताच आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the next year, the corporators will get zero budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.