नेऊरगावला बिबट्याच्या दर्शनाने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 07:16 PM2020-02-02T19:16:53+5:302020-02-02T19:20:24+5:30
जळगाव नेऊर : निमगाव मढ ब्राम्हणगाव रस्त्यावर बिबट्याच्या दर्शनाने परिसरात घबराट असतानाच पश्चिमेकडील नेऊरगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये घबराट आहे.
जळगाव नेऊर : निमगाव मढ ब्राम्हणगाव रस्त्यावर बिबट्याच्या दर्शनाने परिसरात घबराट असतानाच पश्चिमेकडील नेऊरगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये घबराट आहे. नेऊरगाव येथील प्रकाश बोराडे यांच्या वस्तीजवळ नवनाथ कदम यांच्या उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर येताना बैलगाडीतून चाललेल्या बापू बोराडे यांना दिसला त्यांनी त्याला उसकावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर डरकाळी फोडत बिबट्या उसाच्या शेतात पळाला ,त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण असून शेतकरी-शेतमजूर शेतावर कामावर जाण्यासाठी घाबरत असून या परिसरात पिंजरा लावा अशी मागणी येथील शेतकरी व सरपंच विमलबाई पेंढारी यांनी वन विभागाकडे केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक हरगावकर, वनमजूर भिसे, सुनील भुरु क यांनी घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावण्याचा निर्णय घेऊन याठिकाणी पिंजरा लावण्यात आला व त्यामध्ये सावध ठेवण्यात आले, तरी नागरिकांनी व शेतकर्यांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी व शेतीला ग्रुपने पाणी भरावे अशी सूचना करण्यात आली आहे, सध्या शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात चालू असल्याने व परिसरामध्ये मजूर भेटत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे कामे खोळंबली आहे, त्यात बिबट्याच्या दहशतीने शेतकर्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.