निंबाळेत बिबट्या पिंजऱ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:45 AM2018-04-07T00:45:40+5:302018-04-07T00:45:40+5:30
चांदवड : तालुक्यातील निंबाळे शिवारात तब्बल पाच तासांनंतर बिबट्यास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या वनविभागाला गुंगारा देत होता.
चांदवड : तालुक्यातील निंबाळे शिवारात तब्बल पाच तासांनंतर बिबट्यास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या वनविभागाला गुंगारा देत होता. फेब्रुवारी महिन्यात २४ तारखेला वागदर्डी येथील वृद्ध तुकाराम भिवसन सोनवणे (६५) हे गायीला पाणी पाजत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याची भीती होती तर वनविभागावर बिबट्या पकडण्याचे आव्हान असताना शुक्रवारी (दि. ६) सकाळी ६ वाजेच्या सुमारास हरिभाऊ कोंडाजी सोनवणे यांच्या निंबाळे शिवारातील शेतात पाटाचा पूल आहे. या मोरीमध्ये शाळेत सकाळी शाळेत जाणाºया मुलांना या बिबट्याने दर्शन दिले. त्यांनी तातडीने हरिभाऊ सोनवणे व परिसरातील नागरिकांनी ओरडून बिबट्याची माहिती दिली. त्यांनी खात्री करून सदरचा प्रकार वनविभागाचे वनपाल जी.जी. पवार यांच्या कानावर टाकला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनपाल श्रीमती व्ही. जी. खरात, व्ही.डी. पगारे, सोनाली वाघ, ज्ञानेश्वर पगारे यांनी तातडीने निंबाळे व साळसाणे शिवारात बिबट्या पकडण्यासाठी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पिंजरा मागविला. बिबट्या चिडलेल्या अवस्थेत होता. ग्रामस्थांनी बरीच गर्दी केल्याने आवाज व गोंधळ कमी होत नसल्याने वनअधिकाºयांनी ग्रामस्थांना बाजूला केले. नंतर परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यश आले. यावेळी निंबाळेचे सरपंच नंदू चौधरी, साळसाणेचे सरपंच अनिल ठाकरे, नामदेव पवार, अशोक शिंदे, अशोक आहिरे, दयानंद कासव, भरत वाघ आदींसह निंबाळे, साळसाणे उपस्थित होते. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशाने बिबट्याला तानसा येथील अभयारण्यात रवाना केले आहे. वैद्यकिय अधिकाºयांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली.
पाच तास चालले ‘आॅपरेशन’
बिबट्या ज्या मोरीखाली लपला त्याच्या एका दिशेला पिंजरा, तर दुसºया दिशेला मागील बाजूकडून ग्रामस्थांनी फटाके लावले, त्याचवेळी बिबट्या आपोआप पिंजºयात अडकला. हे आॅपरेशन सुमारे चार ते पाच तास चालले अखेर बिबट्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास पकडण्यात वनविभागाच्या अधिकाºयांना यश आले.