निकवेलला बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 08:39 PM2019-03-04T20:39:56+5:302019-03-04T20:40:20+5:30
निकवेल : बागलाण तालुक्याच्या निकवेल गावातील शिवारात रविवारी (दि.३) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेले वासरी फक्त केल्याची घटना घडली.
निकवेल : बागलाण तालुक्याच्या निकवेल गावातील शिवारात रविवारी (दि.३) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेले वासरी फक्त केल्याची घटना घडली. निकवेल गावातील शिवारात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील दहिंदुले, जोरण व कंधाने शिवारात नेहमी आढळणारा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून निकवेल गाव शिवारात मुक्तसंचार करतांना दिसत असल्याचे नागरीकांकडून सांगितले जात होते. परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री निकवेल गावातील रस्त्यावरील शेतीतील गट नं २०७ अशोक सोनावणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरावर बिबट्याने रात्री हल्ला केला.
या हल्ल्यात वासरुठार झाले.
सोमवारी सकाळी सोनावणे शेतात गेल्यावर गोठ्यातील वासरु ठार झालेले दिसले. त्या जागी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. त्यावेळी सोनावणे यांनी वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्याशी संर्पक करुन हा सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर वनखात्याचे प्रफुल्ल पाटील यांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. वासराच्या गळ्याला व पाठीवर बिबट्याच्या दाताने, पंजाचे वार केल्याचे दिसत होते.
परिसरात गेल्या काही दिवसांपासून गवत, झाडांचे व ऊस तोड झाल्यामुळे लपन कमी झाले आहे. त्यामुळे बिबट्यासोबत विविध दोन-तीन श्वापदांचे वास्तव्य वाढल्याचे बोलले जात आहे. बिबट्याच्या संचाराने निकवेल गावातील शिवारातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाने या परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनखात्यातील पाटील याना करण्यात आली. त्यावेळी उपस्थित निकवेल वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, निलेश वाघ, उपसंरपच मुरलीधर वाघ, महेश वाघ, केवळ सोनवणे, गौरव जाधव, विशाल सोनावणे, मिथुन सोनावणे, राजेंद्र सोनवाने यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. (फोटो ०४ निकवेल)