निफ ाडचा पारा ५.२ अंशांवर
By Admin | Published: December 26, 2015 11:55 PM2015-12-26T23:55:41+5:302015-12-26T23:58:13+5:30
निफ ाडचा पारा ५.२ अंशांवर
निफाड : गेल्या चार दिवसांपासून कडाख्याच्या थंडीने गारठलेल्या निफाड तालुक्यातील तपमानात किंचितशी वाढ झाली असून, कुंदेवाडी येथील संशोधन केंद्रात शनिवारी ५.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे.
निफाड तालुका चार दिवसांपासून तपमानात घट झाल्याने गारठून गेला होता. येथे मंगळवारी ७ अंश सेल्सिअस, बुधवारी ६, गुरुवारी ५.६ तर शुक्रवारी नीचांकी ५ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. तपमानाचा पारा दैनंदिन घसरता असल्याने निफाडकरांना आणखी कडाख्याच्या थंडीचा सामना करावा लागेल की काय अशी भीती निर्माण झाली असताना शनिवारी मात्र सतत घसरत्या तपमानात काहीशी वाढ होऊन पारा ५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे तालुक्यात नागरिकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळच्या वातावरणात अजूनही गारठ्याचे प्रमाण अधिक असून दिवसभरातही वातावरणात गारवा कायम होता.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून तपामानात निचांकी घट झाल्याने वाढलेलेल्या थंडीमुळे परिसरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, अतिथंडीमुळे लहान बाळांमध्ये डिसेंट्रीचे प्रमाण वाढल्याचे रुग्णांच्या संख्येवरून दिसून आले. या कडाख्याच्या थंडीचा परिणाम परिसरातील दुग्धव्यवसायवरही झाल्याचे दिसून आला आहे. (वार्ताहर)