निफाडचा पारा ६ अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:39 PM2018-12-20T14:39:39+5:302018-12-20T14:39:54+5:30
निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरुवारी दि २० रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ...
निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरुवारी दि २० रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे.
बुधवारी दि १९ रोजी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले होते . मात्र थंडीने आपला
रु द्रावतार वाढवत नेल्याने गुरु वारी दि २० रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ६ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने निफाडकरांना गारठून टाकले होते. तालुक्यात उसतोडीसाठी आलेल्या ऊस तोड कामगारांनी , शेतकऱ्यांनी , नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता.
----------------
द्राक्ष बागायतदार चिंंतीत
थंडी गहू ,कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे मात्र या वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे पडणे ,फुगवण कमी होणे, द्राक्षाच्या वेलींना अन्न पुरवठा कमी होणे आदी परिणाम होणार असल्याने द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सकाळी भरणाºया शाळांमध्ये विद्यार्थी उशिराने येत होते . थंडीचा कडाका इतका जास्त होता की दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.
-----------------
मागील वर्षी सुद्धा निफाड तालुक्याला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले होते. विशेष म्हणजे मागील वर्षातील सर्वात नीचांकी तापमान ६ अंश सेल्सिअस दि २५ व २६ जानेवारी रोजी झाले होत. त्यामुळे मागील वर्षी असलेल्या नीचांकी तापमानाचा विक्र म यावर्षी मोडला जातो काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .