निफाडचा बाधितांचा दर कमी करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:21+5:302021-04-28T04:16:21+5:30

बनसोड यांनी कंटेन्मेंट झोनमधील नियमांचे अतिशय कडक पालन करण्याबाबत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे ...

Nifad plans to reduce the rate of disruption | निफाडचा बाधितांचा दर कमी करण्याचे नियोजन

निफाडचा बाधितांचा दर कमी करण्याचे नियोजन

Next

बनसोड यांनी कंटेन्मेंट झोनमधील नियमांचे अतिशय कडक पालन करण्याबाबत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे नियोजन करून कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचित केले असल्याचे सांगितले. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आढळून येतात, त्यांचे गृह विलगीकरण करण्यात यावे. परंतु ज्या रुग्णांना घरी पुरेशी व्यवस्था नाही, त्यांची गावातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी तालुक्यात दररोज ३०० ते ४०० रुग्णांची रोज नव्याने भर पडत असून त्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण काटेकाेरपणे करावे व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ग्रामस्तरीय समितीमध्ये पोलीस प्रशासनाच्या एका व्यक्तीच्या समावेश करण्यात यावा जेणेकरून गावात नियम पालनासाठी मदत होईल. तसेच लसीकरणाच्या मोहिमेचे वेळापत्रक दिल्यास तिथेही पोलीस मनुष्यबळ गरजेनुसार पुरविण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, पंचायत समिती सभापती सुलभा पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचक्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे, तालुका नोडल अधिकारी डॉ. चेतन काळे, निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, ओझरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, पिंपळगांव बसवंतचे पोलीस निरीक्षक पटारे आदी उपस्थित होते.

इन्फो

६५ बेडचे कोविड सेंटर

आमदार दिलीप बनकर यांनी कोरोना रुग्णांसाठी लागणारी औषधे व ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर इंग्लिश स्कूलमध्ये ६५ बेडचे सर्व सोयी सुविधा युक्त कोविड सेंटर उभे करीत असून पिंपळगांव बसवंत येथे नवीन ऑक्सिजन प्लांटची सुरुवात करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Nifad plans to reduce the rate of disruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.