निफाडला सामाजिक संस्थेतर्फे रूग्णांची भोजन व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:53 PM2020-03-31T17:53:20+5:302020-03-31T17:53:47+5:30

येथील स्वामी विवेकानंद सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने उप जिल्हा रु ग्णालयातील रु ग्णांना व त्यांच्या कुटुंबियांसह रु ग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत जेवण्याची व्यवस्था पार्सल स्वरूपात करण्यात आली आहे.

 NIFAD provides social care for patients | निफाडला सामाजिक संस्थेतर्फे रूग्णांची भोजन व्यवस्था

निफाडला सामाजिक संस्थेतर्फे रूग्णांची भोजन व्यवस्था

googlenewsNext

निफाड : येथील स्वामी विवेकानंद सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने उप जिल्हा रु ग्णालयातील रु ग्णांना व त्यांच्या कुटुंबियांसह रु ग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत जेवण्याची व्यवस्था पार्सल स्वरूपात करण्यात आली आहे.
निफाड शहरात सध्या कडकडीत लॉकडाऊन असल्याने उप जिल्हा रु ग्णालयातील रु ग्णांची, त्यांच्या कुटुंबियांची व रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने स्वामी विवेकानंद सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने जेवणाच्या डब्याच्या पार्सलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारु ळे , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वाघ , भाजपाचे तालुकाध्यक्ष भागवत बोरस्ते, सुखदेव चौरे ,पंढरीनाथ पीठे, परेश शहा ,सचिन धारराव ,डॉ. पाटील , गौरव वाघ ,बिरजू पठाण , दगू कासव, संतोष बस्ते, बोराडे तसेच या रु ग्णालयातील डॉक्टर्स , परिचारिका , कर्मचारी व शिपाई आदी उपस्थित होते.

Web Title:  NIFAD provides social care for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.