निफाडचा पारा ६.६ अंश सेल्सिअस
By admin | Published: February 13, 2017 12:11 AM2017-02-13T00:11:45+5:302017-02-13T00:11:58+5:30
निफाडचा पारा ६.६ अंश सेल्सिअस
निफाड : तालुक्यात रविवारी सकाळी कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली आहे. बरोबर एक महिन्यापूर्वी गुरुवारी दि. १२ जानेवारी रोजी निफाड तालुक्यात ४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली होती, त्यामुळे अवघा निफाड तालुका पूर्णपणे थंडीने गारठून गेला होता. त्यानंतर हळूहळू थंडीचे प्रमाण कमी होत गेले व उन्हाचे चटके बसू लागले होते. परंतु बरोबर एक महिन्यानंतर रविवारी (दि. १२) निफाड तालुक्यात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तपमानाची नोंद झाली त्यामुळे निफाड थंडीने गारठून गेले होते. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळचे जनजीवन मंदावले होते.
सध्या उशिराच्या द्राक्षबागेतील द्राक्षमण्यात पाणी उतरलेले आहे व फुगवण झाली आहे. बहुतेक द्राक्षबागेतील द्राक्ष विक्र ी चालू आहे. ही थंडी वाढत गेल्यास द्राक्ष बागायतदारात चिंता वाढू शकते. गहू आणि कांदा पिकासाठी ही थंडी पोषक आहे. (वार्ताहर)