वादळी वाऱ्यामुळे निफाडचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:49 PM2021-05-17T22:49:56+5:302021-05-18T00:05:21+5:30

निफाड : सोमवारी दिवसभर असलेल्या वादळी वाऱ्यामुळे निफाड शहरात व शिवारात लघुदाब वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीनंतर सायंकाळी ७ च्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

Nifad's power supply was cut off due to strong winds | वादळी वाऱ्यामुळे निफाडचा वीजपुरवठा खंडित

वादळी वाऱ्यामुळे निफाडचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext
ठळक मुद्देवादळी वारे वेगाने वाहत असल्याने उच्च दाबाची वीज तार तुटली

निफाड : सोमवारी दिवसभर असलेल्या वादळी वाऱ्यामुळे निफाड शहरात व शिवारात लघुदाब वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीनंतर सायंकाळी ७ च्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

वादळी वारे वेगाने वाहत असल्याने शहरातील वैनतेय विद्यालयाजवळील उच्च दाबाची वीज तार तुटली होती. तसेच पोलीस ठाण्याजवळील लघु वीजवाहिनी तुटली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कर्मचाऱ्यांनी यावीज वाहिन्या दुरुस्त केल्या. हे दुरुस्तीचे काम करताना उंच वाढणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्या लागल्या. त्यामुळे दुरुस्तीला वेळ लागत होता. सायंकाळी ७ च्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू झाला.

दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे निफाड शेत शिवारातील ४ ते ५ ठिकाणी लघु वीजवाहिनी तुटल्याने शिवारातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम सायंकाळी उशिरापर्यंत चालू होते. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील पिंप्री येथे ११ केव्ही उच्च दाब वीजवाहिनीचा खांब खाली पडला होता. हा खांब तातडीने उभा करण्यात आला. उगाव, शिवडी भागातही रविवारी (दि.१६) रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सोमवारी (दि.१७) सायंकाळपर्यंत सुरू झालेला नव्हता. याही भागात उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम चालू होते.

Web Title: Nifad's power supply was cut off due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.