निफाड @ 2.8 अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:06 AM2018-12-31T02:06:42+5:302018-12-31T02:08:00+5:30

निफाड तालुक्यात थंडीने ठाण मांडले असून, तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. रविवारी (दि. ३०) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात २.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला आहे.

Nifed @ 2.8 degrees Celsius | निफाड @ 2.8 अंश सेल्सिअस

निफाड @ 2.8 अंश सेल्सिअस

Next
ठळक मुद्देनीचांकी तापमान : अवघा तालुका गारठलावºहाडी मंडळींनी लॉन्सबाहेरच ठोकला तळ

निफाड : तालुक्यात थंडीने ठाण मांडले असून, तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. रविवारी (दि. ३०) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात २.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला आहे.
गुरुवारी, दि. २७ रोजी या तालुक्यात १.८ सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने मागील वर्षाचा ६ अंश सेल्सिअस तापमानाचा विक्र म मोडला गेला होता. शुक्र वारी (दि.२८) ४ अंश सेल्सिअस तर शनिवारी (दि २९) ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पारा अधिक खाली येत रविवारी (दि ३०) २.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले आहेत. गेल्या आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीने निफाड तालुक्यात ठाण मांडल्याने दिवसभर वातावरणात गारवा असल्याने बहुतेकजण उबदार कपडे घालणे पसंत करत आहे. रविवारी, दि. ३० रोजी दुपारच्या लग्नात वºहाडी मंडळी वातावरणात गारठा असल्याने कार्यालयात न बसता लॉन्सबाहेर हिरवळीवर उन्हात बसणे पसंत केले. बाजाराच्या दिवशी उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कडक्याच्या थंडीमुळे सायंकाळी ६ नंतर नागरिक घरात थांबणे पसंत करीत आहेत.
कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर परिणाम होऊ लागला आहे़ रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसाठी थंडी पोषक असली तरी द्राक्षबागांना हानिकारक असल्याने द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे़ वाढत्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावतो की काय अशी चिंता द्राक्ष उत्पादकांना सतावून लागले आहे़
थंडीपासून द्राक्षाचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहेत़ दिंडोरी तालुक्यातही द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे़
इगतपुरीत टमाट्यावर करपा
इगतपुरी तालुक्यातही थंडीचा जोर कायम असून, मागील
चार-पाच दिवसांपासून लोक गारठले आहेत़ वाढत्या थंडीमुळे टमाट्यासारख्या पिकांवर करपा रोगाचा पादुर्भाव होऊ लागला आहे़ यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागत आहेत़ यामुळे शेतकºयांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे़

Web Title: Nifed @ 2.8 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.