निफाड @ 40.6 अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:03 AM2018-05-16T01:03:20+5:302018-05-16T01:03:20+5:30
निफाड : तालुक्यात उष्णतेने कहर केला असून, मंगळवारी (दि. १५) कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली आहे.
निफाड : तालुक्यात उष्णतेने कहर केला असून, मंगळवारी (दि. १५) कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून निफाड तालुक्यात उष्म्याचे प्रमाण वाढत आहे. प्रचंड उष्णतेने दिवसातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसागणिक सूर्यनारायण उष्णतेची आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी ९ वाजताच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात होते. दुपारच्या सुमारास तालुक्यातील रस्त्यावर वाहतूक तुरळक असते.
उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी नागरिक घरात आराम करणे पसंत करीत आहेत, तर कांद्याच्या चाळीवर काम करणाऱ्या मजुरांना प्लॅस्टिक कापडाचे शेड तयार करून घ्यावे लागत आहे. एवढ्या उन्हात काम करणे मजुरांना अशक्य असते. शेतकºयांना ट्रॅक्टरने शेत मशागतीची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी ५ नंतर करावी लागत
आहेत.निफाड येथील व्यापारी पेठेत दुपारच्या वेळी शुकशुकाट असतो. मंगळवारी ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली. हे तालुक्यातील यावर्षीचे सर्वात उच्च तपमान असल्याचे हवामान केंद्राच्या अधिकाºयांनी सांगितले. मागील वर्षी या तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली होती.