निफाड ९ अंश सेल्सिअस

By admin | Published: November 7, 2016 11:00 PM2016-11-07T23:00:18+5:302016-11-07T23:27:11+5:30

नाशिक गारठले : तपमान सातत्याने घसरत आहे.

Nifed 9 degrees Celsius | निफाड ९ अंश सेल्सिअस

निफाड ९ अंश सेल्सिअस

Next

निफाड : तालुक्यात नेहमीप्रमाणे पारा खाली येण्यास प्रारंभ झाला असून, सोमवारी सकाळी निफाड तालुक्यात सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे.
राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ झाल्याने पारा किमान १० अंश सेल्सिअस खाली घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर शुक्र वारी १३ अंश, शनिवारी ११.४, रविवारी ९.४ तर सोमवारी किमान ९ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. यंदा राज्यात भरपूर पाऊस झालेला आहे. निफाड तालुक्यात नद्या भरपूर भरलेल्या आहेत. तालुक्यातील जल साठे भरले आहेत. पावसानंतर आॅक्टोबरमध्ये उष्णता न जाणवताच राज्यात थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. कडाक्याच्या थंडीने निफाड तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे. वाढत्या थंडीमुळे गहू, हरभरा, कांदा, लसूण, ज्वारी पिकांना फायदेशीर ठरणार आहे. मात्र थंडी अशी टिकून राहिल्यास तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Nifed 9 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.