निफाड साखर कारखाना पुन्हा अवसायनात
By admin | Published: March 22, 2017 01:36 AM2017-03-22T01:36:34+5:302017-03-22T01:36:50+5:30
निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्याचा संचित तोटा २०२ कोटी व नकतमूल्य वजा १७७.६० कोटींवर गेल्यामुळे प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशान्वये निसाका अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहे.
निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्याचा संचित तोटा २०२ कोटी व नकतमूल्य वजा १७७.६० कोटींवर गेल्यामुळे प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशान्वये निसाका अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहे. कारखान्यावर अवसायक म्हणून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) बी. वाय. पगारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक वाय. आर. शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही ३ आॅगस्ट २०१६ रोजी कारखाना अवसायानात काढण्याचा आदेश पारित झाला होता.परंतु जिल्हा बँकेने न्यायालयात दावा दाखल केल्याने या आदेशाला स्थगीती देण्यात आली होती. गेले ३ गळीत हंगाम बंद असलेला कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना होता. अवसायनात निघाल्याने कारखान्याचे अस्तीत्व राहील कि नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. नासाकावर नियुक्त प्रशासक मंडळाकडून कार्यक्षेत्रात नासाका सुरु करण्यासाठी दौरे सुरु असून कोणत्याही परिस्थितीत मंडळाकडून नासाका सुरु करण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अशीच स्थिती असलेल्या निफाड साखर कारखाण्याबाबत तालुक्यातील राजकीय नेत्यांची उदासीनता शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे. निसाका उर्जीतवस्थेत आणण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याची भावना ऊस उत्पादक श्ेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बंद पडलेले साखर कारखाने विक्र ी न करता अवसायानात काढून भाडेतत्वावर चालवायला देण्याचे सरकारचे धोरण आहे. (वार्ताहर)