निफाडला सर्वपक्षीय मोर्चा
By admin | Published: July 21, 2016 12:08 AM2016-07-21T00:08:45+5:302016-07-21T00:19:48+5:30
उत्स्फूर्तता : शहरात कडकडीत बंद
निफाड : कोपुर्डी येथे अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचार व हत्त्येच्या निषेधार्थ निफाड येथे बुधवारी सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाय शहरातून मोर्चा काढण्यात आला होता. यात सर्वपक्षांतील पदाधिकारी सहभागी झाले होते.
कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी निफाड बंदचे व मोर्चाचे नियोजन करण्यासाठी वैभव कापसे, कपिल पवार, भावेश घोलप, सौरभ टापसे, तुषार रंधवे, सर्वंकष भोसले, वैभव गाजरे, हर्षल धारराव, संदीप धारराव, अनुप वनसे या युवकांनी पुढाकार घेतला होता. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत निफाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारीवर्गाने उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली होती.
याप्रसंगी राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, विक्रम रंधवे, रावसाहेब गोळे यांची भाषणे झाली. या मोर्चात निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, माजी पंचायत समिती सदस्य वाल्मीक कापसे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, माजी शहरप्रमुख रमेश जेऊघाले, संजय धारराव, निफाड वकील संघाचे अध्यक्ष जी.एन. शिंदे, नगरसेवक देवदत्त कापसे, जावेद शेख, दिलीप कापसे व एकनाथ तळवाडे तसेच नितीन कापसे, विक्रम रंधवे, कैलास धारराव, संजय गाजरे, महावीर चोरडिया, दीपक गाजरे, भगवान गाजरे, बापू कापसे, मोहन जाधव, नंदू कापसे, सागर कुंदे, सचिन जाधव, धीरज बिनायिक्या, गौरव कुंदे, धनू कुंदे, ईश्वर धारराव, गौतम कुंदे, महेंद्र गोळे, सागर कापसे, प्रथमेश कापसे, सूरज परदेशी, हर्षद निमसे, सूरज कुंदे, सागर व्यवहारे, तुषार खालकर, शैलेश जाधव, शिवम मेधने, सुबोध व्यवहारे, शुभम ढगे, रावसाहेब गोळे, महेश चोरडिया, सुधीर कर्डिले, दत्तू महाजन, निवृत्ती मेधने, वकील शेख, माणीक गायकवाड, मोहन व्यवहारे, डॉ.भूषण राठी, शिरीष कापसे, बाळासाहेब रंधवे, निखिल भवर, दत्तू गाजरे, यांच्यासह मोठ्या संख्येने निफाडकर मोर्चात सामील झाले होते. (वार्ताहर)