नाशकात आजपासून रात्रीची संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 01:14 AM2021-02-22T01:14:30+5:302021-02-22T01:15:48+5:30
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिक शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२२) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे संचारबंदी लागू होऊ शकते, अशी चर्चा असताना रविवारी पालकमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिक शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२२) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे संचारबंदी लागू होऊ शकते, अशी चर्चा असताना रविवारी पालकमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत
गेली. मागील पाच दिवसांत तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता नागरिकांमधील बेफिकीरी वाढल्याचा निष्कर्ष समोर आल्याने संचारबंदी लागू करावी लागत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
रात्री ११ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नाशिककर जबाबदारीने वागले नाहीत, तर रात्री ८, ९ किंवा १० वाजेपासून संचारबंदी वाढविली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना रोखण्याची जबाबदारी ही नाशिककरांची असून, त्यांनी खबरदारी घेणे अपेक्षित असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
या काळात पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. लग्ण सोहळ्यांना होणारी गर्दी, तसेच बाजारपेठेतील गर्दी पाहता संचारबंदी लागू करण्याची वेळ आली आहे. नाशिककरांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.