मुंबई-नागपूरच्या आधी मालेगाव येथे ‘नाइट लाइफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:06 PM2020-02-07T22:06:20+5:302020-02-08T00:08:42+5:30

महाविकास आघाडीने मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नागपूर शहरातूनही नाइट लाइफची मागणी होत आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव शहराच्या पूर्व भागात रात्रीचा दिवस होत असल्याने खऱ्या अर्थाने ‘नाइट लाइफ’ अमलात आणणारे मालेगाव हे प्रथम शहर ठरले असावे.

'Night Life' at Malegaon before Mumbai-Nagpur | मुंबई-नागपूरच्या आधी मालेगाव येथे ‘नाइट लाइफ’

मुंबई-नागपूरच्या आधी मालेगाव येथे ‘नाइट लाइफ’

Next
ठळक मुद्देखवय्यांना मेजवानी : यंत्रमाग कामगाराची वर्दळ असल्याने व्यवसाय तेजीत




शफीक शेख।
मालेगाव : महाविकास आघाडीने मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नागपूर शहरातूनही नाइट लाइफची मागणी होत आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव शहराच्या पूर्व भागात रात्रीचा दिवस होत असल्याने खऱ्या अर्थाने ‘नाइट लाइफ’ अमलात आणणारे मालेगाव हे प्रथम शहर ठरले असावे.
मालेगावच्या पूर्व भागात रात्री यंत्रमागाचा खडखडाट सुरू असतो त्यामुळे या भागात रात्री हॉटेल्ससह दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. यंत्रमागावर काम करणारे मजूर हॉटेल्सवर मोठ्या संख्येने हजेरी लावतात त्यामुळे रात्री यंत्रमाग कामगारांना यंत्रमागांवर काम करतानाच विरंगुळा म्हणून ‘ब्रेक’ घेण्याकरिता हॉटेल्सवर चहापानासाठी कामगार एकत्र आलेले दिसतात. यावेळी मालेगावच्या पश्चिम भागात सर्वत्र शांतता असते तर पूर्व भागात दैनंदिन वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू असते किंबहुना बाहेरगावाहून आणि पश्चिम भागातून मोठ्या संख्येने खवय्ये हॉटेल्सवर गर्दी करीत असतात. बाहेरगावाहून शहरात येणारा प्रवासी त्यामुळे उपाशी राहत नाही. रमजान ईदसह शब-ए-बारातसारख्या सणांच्या दिवशी रात्री रस्ते फुलून गेलेले असतात. रमजान महिन्यात तर सणासाठी वस्तू आणि कपड्यांच्या खरेदीसाठी महिलांसह लहान मुलांचीही किदवाई रोडसह बाजारपेठांमध्ये रीघ लागलेली असते विशेष म्हणजे मुंबईसारख्या शहरात ‘नाइट लाइफ’चा विषय चर्चेला आला त्यावेळी विरोधी पक्षासह विविध नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने शंका उपस्थित केल्या, मात्र मालेगावच्या पूर्व भागात रात्रीचा दिवस होत असून, सुरक्षिततेसाठी कोणताही अवास्तव बंदोबस्त लावावा लागत नाही. त्यामुळेच महिलावर्ग रात्री उशिरापर्यंत घरातून बाहेर पडू शकतात. त्याचमुळे मालेगावची ‘लाइफ स्टाइल’ मुंबईपेक्षाही फार पूर्वीपासून अशीच सुरू आहे.
मुंबई-पुणेसारख्या शहरात रात्री सर्वत्र सामसूम असते; मालेगावात रात्री कितीही उशिरा प्रवासी बसमधून उतरला तरी त्याला हमखास रिक्षा मिळेल शिवाय रात्रीचा ‘चार्ज’ म्हणून इतर शहरात रिक्षाचालकांकडून जशी आर्थिक पिळवणूक केली जाते तशी पूर्व भागात रिक्षाचालक आर्थिकदृष्ट्या प्रवाशांना फसवत नाहीत.

Web Title: 'Night Life' at Malegaon before Mumbai-Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.