रात्रीच्या वेळी मैदानात भरते मद्यपींची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:30 AM2018-10-30T00:30:09+5:302018-10-30T00:30:29+5:30

येथील गणेश चौक परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत बोटावर मोजण्याइतके जेमतेम विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळेला घरघर लागलेली असताना शाळेत सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी चक्क या मैदानात जुगारी तसेच मद्यपींची शाळा भरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 Night school at night in the field | रात्रीच्या वेळी मैदानात भरते मद्यपींची शाळा

रात्रीच्या वेळी मैदानात भरते मद्यपींची शाळा

Next

सिडको : येथील गणेश चौक परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत बोटावर मोजण्याइतके जेमतेम विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळेला घरघर लागलेली असताना शाळेत सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी चक्क या मैदानात जुगारी तसेच मद्यपींची शाळा भरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  गणेश चौक येथे असलेल्या मनपाच्या शाळेला आधीच घरघर लागलेली असून, या शाळेत दररोज बोटावर माजण्याइतकेच विद्यार्थी शाळेत येत असल्यामुळे शिक्षकांचेही शाळेकडे दुर्लक्ष झाले आहे. वेळ मिळेल तेव्हा शिक्षक शाळेत येत असल्याने शाळेची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. शाळेत दररोज प्रत्येक वर्गात चार ते पाच विद्यार्थी येत असल्याने शिक्षकांकडून सर्व वर्ग एकत्र करून विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. या शाळेचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले असून, संरक्षण भिंतीची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी शाळेच्या आवारात सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी या शाळेच्या मैदानाचा ताबा जुगारी तसेच मद्यपींनी घेतला आहे. अंबड पोलिसांनी गेल्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सवानिमित्त गुन्हेगारांवर कारवाई केली असून, काहींना तडीपार करण्याची मोहीमही राबविली असली तरी गेल्या काही दिवसांपासून सिडकोसह परिसरात स्वत:ला भाई समजणाऱ्यांनी शाळेच्या मैदानालाच आपला अड्डा बनविला आहे. या टवाळखोरांकडून भरदिवसा महाविद्यालय परिसरासह मुख्य चौकात दहशत पसरविण्याचे प्रकार केले जात आहे. काही दिवसांपूर्वी उत्तमनगर भागात टवाळखोरांमध्ये हमरीतुमरी झाल्याचा प्रकार घडला होता. या सर्व घटना पाहता, सिडकोतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेश चौक शाळेबाबत विचार करून येथील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत वर्ग करून ही शाळा पूर्णपणे बंद करावी किंवा या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत मद्यपी तसेच जुगारींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टवाळखोरांचा वावर वाढला
उत्तमनगर येथील सिडको महाविद्यालयाच्या बाहेरही स्वत:ला भाई समजणाºया टवाळखोरांचा महाविद्यालयाच्या वेळेत वावर वाढला आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर मुलींच्या छेडखानीचे प्रकार भरदुपारी घडत असून, त्यातूनच अनेक वेळा वाद होत असल्याचे परिसरातील दुकानदारांचे म्हणणे आहे. महाविद्यालयालगत असलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या भाईगिरीचा परिणाम जाणवत आहे.

Web Title:  Night school at night in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.