पंचवटी, नाशिकरोड परिसरात रात्रीचा प्रवास धाेक्याचा; वर्षभरात साडेनऊ हजार जणांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:57+5:302021-09-14T04:17:57+5:30

इन्फो... ..या चौकात जरा सांभाळून पंचवटी विभागातील दिंडोरी नाका, बाजार समिती परिसर, फुलेनगर, गोदाघाट, गणेशवाडी, नाशिकराेड विभागातील जेलरोड, सायखेडा ...

Night travel in Panchavati, Nashik Road area; Dog bites on nine and a half thousand people throughout the year | पंचवटी, नाशिकरोड परिसरात रात्रीचा प्रवास धाेक्याचा; वर्षभरात साडेनऊ हजार जणांना श्वानदंश

पंचवटी, नाशिकरोड परिसरात रात्रीचा प्रवास धाेक्याचा; वर्षभरात साडेनऊ हजार जणांना श्वानदंश

Next

इन्फो...

..या चौकात जरा सांभाळून

पंचवटी विभागातील दिंडोरी नाका, बाजार समिती परिसर, फुलेनगर, गोदाघाट, गणेशवाडी, नाशिकराेड विभागातील जेलरोड, सायखेडा रोड, दुर्गा माता मंदिर, बिटको चौक, सुभाष मार्केट, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, उंटवाडी, पवननगर, रायगड चौक, सहावी योजना, खुटवडनगर

इन्फो...

श्वानांच्या नसबंदीवर

१०००००००

खर्च होऊनही शंका

- नाशिक महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. मात्र, गरजेनुसार खर्च केला जातो.

- एका श्वानाच्या नसबंदीसाठी ६७५ रुपये इतका खर्च ठेकेदाराला दिला जातो. ठेकेदाराच्या दोन व्हॅन असून, त्यात श्वान पकडले जातात.

इन्फो..

रेबिजचा मोठ्या प्रमाणात वापर

नाशिक शहरात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत नऊ हजार ६७२ श्वान चावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार रुग्णांना रेबिज इंजेक्शन देण्यात आले आहे. अर्थात, श्वान चावण्याचा हा आलेख घसरता असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

इन्फो..

आम्हाला चोरांची नाही, श्वानांची भीती वाटते

कोट...

घरात चोरी होऊ नये यासाठी नागरिक श्वान पाळत असले तरी ते रात्री रस्त्यावर मुक्त असतात. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर ते धावत असल्याने चोरापेक्षा श्वानांची भीती अधिक वाटते.

- मिलिंद भालेराव, व्दारका

काेट..

पंचवटी परिसरात रात्री सोडाच; परंतु दिवसाही फिरणे कठीण झाले आहे. चौकाचाैकात असलेले श्वान अंगावर धावत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची धावपळ होते.

- नंदकुमार क्षेमकल्याणी, पंचवटी

कोट...

नाशिक शहरात ७८ हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून, ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. अर्थात, श्वानांचे निर्बीजीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे सतत हे काम सुरू असते. शहरालगतच्या गावठाण भागातदेखील श्वानांचे निर्बीजीकरण झाल्यास त्यामुळेदेखील शहरातील श्वानांचा त्रास कमी होईल.

- डॉ. प्रमोद साेनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा

इन्फो.. श्वान आवरा हो...

एप्रिल २०- ६८०, मे ७५९, जून ६१२. जुलै ४३६, ऑगस्ट ५८८, सप्टेंबर ६४३, ऑक्टोबर ६३२, नोव्हेंबर- ८३२, डिसेंबर-९३०, जानेवारी ११२१, फेब्रुवारी- १२०१, मार्च- १८३८.

Web Title: Night travel in Panchavati, Nashik Road area; Dog bites on nine and a half thousand people throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.