...अन् रात्री चालला ‘खाकी’चा दंडासह दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:19+5:302021-03-29T04:10:19+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने रविवारी नवे आदेश जारी केले आहेत. केवळ वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित दुकाने वगळता अन्य ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने रविवारी नवे आदेश जारी केले आहेत. केवळ वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने रात्री आठ वाजेला बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी शहर पोलिसांनी तातडीने सुरु केली. नाशिकरोड, उपनगर, सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन व्यावसायिकांना ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिली. तसेच सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन व्यावसायिकांना ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिली. तसेच विविध व्यावसायिकांना योग्य अंतरावर वर्तुळ, चौकोन दुकानांसमोर आखून त्यामध्ये ग्राहकांना उभे राहण्याच्या सूचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर दिला गेला. सरकारवाडा पोलिसांनी मेहेर सिग्नलवरील हॉटेल मेहेर या अस्थापनेला नियमांचे भंग केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतदेखील पोलिसांकडून कठोर कारवाई करत मनपाच्या पथकासोबत सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी ३ हजार तर मास्क न लावल्याप्रकरणी १७ बेफिकिर लोकांना एकुण साडेतीन हजारांचा दंड करण्यात आला. रात्री आठ वाजता दुकाने बंद न केल्यामुळे एकुण सात अस्थापनाचालकांना प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे ३५ हजारांचा दंड करण्यात आला. तसेच पोलिसांनी वैयक्तिक स्तरावर मास्कविना फिरणाऱ्या सहा लोकांकडून १२०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच एका व्यक्तीकडून रस्त्यावर थुंकल्यामुळे एक हजाराचा दंड घेण्यात आला.
--इन्फो--
पंचवटीत तीन बीअर बारवर कारवाई
पंचवटी परिसराती तीन बीअर बार चालकांवर कारवाई करत पुढील आदेशापर्यंत ‘सील’ करण्यात आले. पोलिसांची धडक कारवाई शहरात एकाचवेळी सुरु झाल्याने नाशिकरोड भागासह मध्यवर्ती भागातील मेनरोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, पंचवटी कारंजा, गंगापुररोड, शरणपुररोड, भद्रकाली, जुने नाशिक या भागातील केवळ मेडिकल वगळता अन्य सर्व दुकानांची शटर डाऊन होण्यास सुरुवात झाली होती. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहर सर्व सामसूम झाले होते.
---इन्फो---
व्यावसायिकांची उडाली धावपळ
राज्य शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे केवळ मेडिकल वगळता अन्य सर्व दुकाने रात्री आठ वाजता बंद करण्यासाठी शहर पोलीस रविवारी रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसांनी ‘खाकी’च्या शैलीत व्यावसायिकांना इशारा देत कारवाई सुरु केल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. यावेळी विना मास्क दुचाकींवरुन फिरणारे तसेच पादचाऱ्यांनाही पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला. यामुळे शहरातील सर्वच भागात चोखपणे अंमलबजावणी झाल्याचे चित्र दिसून आले.
---
फोटो आर वर : २८हॉटेल नावाने सेव्ह. २८पोलीस रुट मार्च : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुने नाशिक भागात संध्याकाळी रस्त्यावर उतरलेला पोलिसांचा फौजफाटा.
===Photopath===
280321\28nsk_26_28032021_13.jpg~280321\28nsk_27_28032021_13.jpg~280321\28nsk_28_28032021_13.jpg
===Caption===
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुने नाशिक भागात संध्याकाळी रस्त्यावर उतरलेला पोलिसांचा फौजफाटा.~भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुने नाशिक भागात संध्याकाळी रस्त्यावर उतरलेला पोलिसांचा फौजफाटा.~भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुने नाशिक भागात संध्याकाळी रस्त्यावर उतरलेला पोलिसांचा फौजफाटा.