निखिल कुलकर्णी याची एनर्जी इन्फ्ल्युइन्सर २०२१ म्हणून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:51+5:302021-07-11T04:11:51+5:30
नाशिक : ऊर्जा आणि ऊर्जेशी निगडित क्षेत्रात, प्रामुख्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या विषयात, तसेच स्टार्टअप क्षेत्रात दिलेल्या ...
नाशिक : ऊर्जा आणि ऊर्जेशी निगडित क्षेत्रात, प्रामुख्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या विषयात, तसेच स्टार्टअप क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी सोसायटी ऑफ पेट्रोलियम इंजिनिअर्सतर्फे जागतिक स्तरावरचा आशिया-पॅसिफिक विभागासाठी पुरस्कार जाहीर झाला असून त्याची ‘एनर्जी इंफ्ल्युइन्सर २०२१’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
निखिल कुलकर्णी ऊर्जा आणि ऊर्जेशी निगडित क्षेत्रात, मुख्यत्वेकरून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या विषयात, तसेच स्टार्टअप क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ऊर्जा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मासिकाने जगातील ऊर्जा क्षेत्रातील ‘एनर्जी इंफ्ल्युइन्सर २०२१’ म्हणून निवड केली असून यात निखिल कुलकर्णी यांच्यासह १७ जणांचा समावेश आहे. नवीन डिजिटल टेक्नॉलॉजी शोधणे, प्रचलित पद्धतींवर प्रयोग करणे आणि अशा टेक्नॉलॉजिचा वापर करून स्वच्छ ऊर्जा (क्लीन इनर्जी) निर्माण होण्यास मदत करणे अशा पद्धतीचे काम करीत आहोत. त्याचप्रमाणे जगभरातील विविध खनिजतेल आणि नैसर्गिक वायू ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता उत्खननासाठी डिजिटल टेक्नॉलॉजिच्या सहाय्याने नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी आणि कार्यरत करण्यासाठी काम करण्यासाठी त्यांना हा बहुमान देण्यात आला आहे.
100721\10nsk_37_10072021_13.jpg
निखिल कुलकर्णी