दुष्काळ निवारण कक्ष स्थापनेसंदर्भात शून्य कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:05 AM2018-11-17T01:05:03+5:302018-11-17T01:05:17+5:30
दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
नामदेव भोर। नाशिक : जिल्ह्णात दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह दुष्काळग्रस्त भागातील नागरिक जिल्हा परिषदेकडून मिळणाºया मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य शासनाने नाशिक जिल्ह्णातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी व चाºयाचा प्रश्न बिकट होत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्षच्या घोषणेशिवाय अन्य कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे जिल्हा परिषद सत्ताधारी आणि प्रशासनाची ग्रामीण भागातील प्रश्नांसंबंधी असलेली उदासीनता समोर आली आहे.
दुष्काळ घोषित झालेल्या आठ तालुक्यांशिवाय पश्चिम भागातील तालुक्यांतील पिके वाया गेलेली असल्याने या तालुक्यांमध्ये
दुष्काळी परिस्थिती आहे. यासाठी सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा
परिषद अध्यक्ष शीतल सांगळे
यांनी जिल्हा परिषद अंतर्गत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले.
परंतु, स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्षाच्या निर्मितीविषयी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने दुष्काळग्रस्तांची ही अपेक्षा फोल ठरली असून, जिल्ह्णातील दुष्काळग्रस्त जिल्हा परिषदेतर्फे दुष्काळ निधीतून मदत मिळण्याच्या प्र्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील शेतक ºयांना
नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसह चारा छावणी अथवा जनावरांच्या संगोपणासाठी
जिल्हा परिषदेकडून ठोस मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे.