नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:31 AM2019-06-04T01:31:35+5:302019-06-04T01:31:54+5:30

‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली.

 Nilanjan Sambhasa Subhaputram Yamagrajam ... | नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं...

नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं...

googlenewsNext

नाशिक : ‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली. यानिमित्त तेलाचा महाभिषेक, होमहवन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान, पंचवटीत शनि पालखीची शोभायात्रा काढण्यात आली.
रामनगर, पेठरोड, पंचवटी येथील श्री शनैश्चर महाराज उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि. ३) सकाळी ८ वाजता शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर भक्तिधामचे मकरंद गणेशशास्त्री गर्गे यांच्या आचार्यत्वाखाली शनिमहापूजेला प्रारंभ झाला. तसेच शनीमूर्तीला तेलाचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणपती पूजन, पुण्याहवन, मुख्य देवता पूजन, नवग्रह स्थापना पूजन, होमहवन, महापूजा करण्यात येऊन पूर्णाहुतीने उत्सवाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी संयोजक किशे धात्रे, लक्ष्मण धोत्रे, अनिल कुसाळकर, अनिल कोठुळे, तानाजी धोत्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विमल पाटील, कमलेश बोडके, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, प्रभाकर पाटील आदि उपस्थित होते.
सिडको परिसरात सामूहिक जप
जुने सिडको परिसरातील श्री शनैश्चर उत्कर्ष मंडळाच्या शनिजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवती अमावस्या व शनी जयंती निमित्त सकाळी महाभिषेक, होमहवन करण्यात आले. तसेच २३ हजार सामूहिक जप करण्यात आले. याप्रसंगी संतमहंत उपस्थित होते. यावेळी भाविकांना स्फटिक शिवलिंग, श्नीकवच व मारुतीचे छायाचित्र भेट देण्यात आले. दरम्यान शानिमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
देवळालीगावात श्री शनि महाराज जयंती साजरी
ॐ शनैश्वराय नम: च्या जयघोषात देवळालीगांव श्री शनैश्वर महाराज मंदिरात श्री शनि महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री शनि महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी हभप ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोमवारी पहाटे श्री शनिमहाराजांच्या मूर्तीला तेलाभिषेक करण्यात आला. सकाळी त्र्यंबकबाबा भगत, अण्णा गुरूजी माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, पंचकमिटी अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बापू कदम, त्र्यंबकराव गायकवाड आदिंच्या हस्ते मांडव डहाळे व महाआरती करण्यात आली.
श्री शनि महाराज यांच्य प्रतिमेची व पालखीतून चांदीच्या मूर्तीची बिटको चौकातून देवळालीगांव पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, केशव पोरजे, सत्यभामा गाडेकर, व्यापारी बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, संचालक सुधाकर जाधव, मनोहर कोरडे आदिंसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान मंदिराच्या प्रांगणात यज्ञपूजा व होमहवनास पाच जोडपे बसले होते. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सत्यनारायण पूजा व महाआरती करण्यात आली.

Web Title:  Nilanjan Sambhasa Subhaputram Yamagrajam ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.