खैरगावचा निलेश आघान कुस्तीत राज्यात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:40 PM2018-11-15T17:40:46+5:302018-11-15T17:45:46+5:30
घोटी : कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्र मांक पटकाविलेल्या खैरगाव (ता. इगतपुरी) येथील पहिलवान निलेश विठ्ठल आघान (१७) याचा घोटी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

क्र ीडा युवक संचनालय महाराष्ट्र, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद, क्र ीडा परिषद व जिल्हा क्र ीडा अधिकारी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन (दि.१० ते १४) नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शाहू महाराज खासबाग मैदानात करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील एकमेव असलेल्या खैरगाव येथील निलेश अघान याने ६३ किलो वजनी गटात द्वितीय क्र मांक पटकावत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकून नाशिक जिल्ह्याचे नाव मोठे केले.
राज्यात निलेशने मिळविलेल्या यशाबद्दल घोटी पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी निवत्ती जाधव, पोलीस हवालदार धर्मराज पारधी, नितीन भालेराव, शीतल गायकवाड, विश्वास पाटील, बिपीन जगताप, शरद कोठुळे, गणेश सोनवणे, अमोल केदारे, संदीप मथुरे, भगवान मधे, सुहास गोसावी, विक्र म झाल्टे, भास्कर शेळके, निलेशचे वडिल विठ्ठल अघान, सोमनाथ घारे आदि उपस्थित होते.