ममदापूरच्या अरण्यात आढळली नीलगाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:16 AM2021-08-26T04:16:56+5:302021-08-26T04:16:56+5:30

ममदापूर : येवला तालुक्यातील नाशिक वन विभाग पूर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात हरिण, काळविटांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना ...

Nilgai found in the forest of Mamdapur | ममदापूरच्या अरण्यात आढळली नीलगाय

ममदापूरच्या अरण्यात आढळली नीलगाय

Next

ममदापूर : येवला तालुक्यातील नाशिक वन विभाग पूर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात हरिण, काळविटांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे साडेपाच हजार हेक्टरवर असलेल्या या राखीव वनक्षेत्रात हरिण, काळविटांच्या क्रीडा वाढल्याने शुभ वर्तमान मानले जात आहे. ममदापूर अरण्यात वन्य प्राण्यांसाठी पूरक वातावरण असल्यामुळे अरण्यात दिवसेंदिवस नवनवीन वन्यप्राणी अधिवासासाठी आकर्षित होत आहे.

त्याचबरोबर ममदापूर संवर्धन राखीव जंगलात हरिण, काळविटांच्या प्रजातीची संख्या वाढत असताना संवर्धन क्षेत्रात काळवीट, हरिण-बछडे, मोर, लांडगा, खोकड, तरस, रानडुक्कर इत्यादी जंगली प्राण्यांचा अधिवास असताना अशातच नुकत्याच तीन-चार दिवसांपूर्वी ममदापूरच्या अरण्यात सुबक शरीरबांधा असलेली नीलगाय परिक्षेत्रात आढळून आली आहे. दिवसेंदिवस विविध प्रजातींचे वन्यप्राणी ममदापूर अरण्याकडे आकर्षित होत आहेत. वनविभाग नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व विभागातील ममदापूर, राजापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण, रेंडाळे या गावांच्या परिसरात विस्तारलेले जंगल, गवती कुरण, पाण्याची सुविधा ममदापूर संवर्धन हरिण, काळविटांचे प्रसिद्ध वनसंवर्धन म्हणून ओळख आहे.

-----------------

वन्य प्राण्यांचा मुक्काम

चांगला पाऊस पडल्यामुळे हरिण, काळविटांचे जंगलातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्याची सोय व गवतासह अन्य प्रकारच्या झाडाझुडपांची लपण संवर्धन क्षेत्रात असल्यामुळे वन्य प्राण्यांचा क्षेत्रातच मुक्काम वाढीस लागला आहे. या वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या परिसरात लांडगा, मोर, तरस, रानडुक्कर यांचेही संवर्धन होत आहे. त्याचबरोबर आता नीलगाय आढळून आल्यामुळे येथील परिसर अधिकच नयनरम्य आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

(२५ ममदापूर)

250821\25nsk_11_25082021_13.jpg

२५ ममदापूर

Web Title: Nilgai found in the forest of Mamdapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.