निलगिरीवर अडकलेल्या घारीची अखेर सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:18 AM2019-03-16T00:18:50+5:302019-03-16T00:30:13+5:30

नाशिक : सिडको परिसरातील बाजीप्रभू चौक परिसरातील निलगिरीच्या झाडावर सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या घार पक्ष्याची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका ...

Nilgiris get rid of the trapped flight | निलगिरीवर अडकलेल्या घारीची अखेर सुटका 

निलगिरीवर अडकलेल्या घारीची अखेर सुटका 

Next

नाशिक : सिडको परिसरातील बाजीप्रभू चौक परिसरातील निलगिरीच्या झाडावर सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या घार पक्ष्याची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. सिडको भागात निलगिरीच्या झाडावर घार अडकली होती. मनपा शाळेतील शिक्षिका पाटील यांनी सदर बाब निदर्शनास येताच महापालिकेच्या विद्युत विभागाला कळविली. त्यानंतर विद्युत विभागाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एस. जी. मतवाड, एन. के. व्यवहारे, पी. जी. लहामगे, व्ही. के. पाटील, एस. के. शिंदे यांनी वाहनाच्या सहाय्याने घारीची सुटका केली.

Web Title: Nilgiris get rid of the trapped flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.