नायलॉन मांजा ठरतोय पक्षांसाठी जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 05:05 PM2018-12-02T17:05:31+5:302018-12-02T17:18:14+5:30
सायखेडा : हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सुरवात होत असली तरी नायलॉन मांजा हा आकाशात उडणाºया पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात अनेक देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने धरण क्षेत्रात विहंग करणाºया पक्षांसाठी नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे.
सायखेडा : हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सुरवात होत असली तरी नायलॉन मांजा हा आकाशात उडणाºया पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात अनेक देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने धरण क्षेत्रात विहंग करणाºया पक्षांसाठी नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे.
अशाप्रकारचा मांजा हा धोकादायक असून यावर बंदी आलेली असताना ही त्याचा सर्वत्र सर्रास वापर केला जात असल्याचे दिसत आहे. संक्र ांतिनिमित्त लहानांपासुन थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होत असतो. परंतु उत्साहाच्या भरात पाहिजे ती सुरक्षेची काळजी न घेतल्याने परिणामी अपघातांना आमंत्रण मिळते.
पतंग उडवतांना तुटलेला मांजा बºयाचदा झाडांवर व विजेच्या तारांवर जसल्या तसाच राहिल्याने पक्षांना मोठी दुखापत होते. पक्षांच्या प्रमाणेच हा नायलॉन मांजा मानवीजीवनास देखील अपायकारक असुन आत्तापर्यंत या अशाप्रकारच्या मांजामुळे अनेकांचे गळे, हात पायांना ईजा झाली असून अनेक पक्षी देखील या मांजामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
नायलॉन मांजाचा पक्षांना व मानवाला असणारा धोका लक्षात घेता शासनाने त्याच्या विक्र ीला बंदी घातली असुन राज्य शासनाने ही अधिसूचना पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार जारी केली आहे. पेटा या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या मांजावर बंदीसाठी याचिका देखील दाखल केली होती. पेटा ने सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला मांजावर बंदी साठी देखील आवाहन केले होते. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला देखील यावर बंदी साठी आवाहन केल्याने त्यानंतर राज्यसरकारने आदेश पारित करून नायलॉन मांजावर बंदी टाकली आहे.
आकाशात उडत असलेल्या पक्षांवर या मांजामुळे मोठी संक्र ात आली असून पक्षांना हा मांजा दिसून येत नसल्याने त्यांच्या पंखांना गंभीर दुखापत होते. या नायलॉन मांजामुळे अनेक पक्षांचा प्राण देखील गेलेला आहे. दरम्यान नायलॉन मांजा खरेदी व विक्र ी करणाºयावर कलम १८८ अन्वये कारवाई होईल.
नायलॉन मांजा निर्मिति व विक्र ी यावर बंदी घालण्यात आली आहे. यांचे उल्लंघन करणाºया व्यक्तीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम १९६० च्या कायद्याच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा नायलॉन मांजाचा वापर टाळावा.
अंबादास मोरे,
पोलीस निरीक्षक, सायखेडा पोलीस स्टेशन.
पतंग उडवीण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडून निसर्गाला धोका पोहोचतो व मानवी जीवण देखील संकटात सापडले आहे. त्यामुळे येणारी संक्र ात हि आपल्या बरोबरच पक्षांना देखील गोड वाटावी यासाठी अशा प्रकारचा मांजा पतंग उडवतांना टाळायला हवा आहे.
डॉ. उत्तम डेर्ले,
पक्षी प्रेमी, निफाड.
सायखेडा व परिसरात नांदूरमध्यमेश्वर हे महत्वाचे पक्षी अभयारण्य असल्याने येथे विविध पक्षी मोठया प्रमाणात आढळतात. पालकांनी आपल्या पाल्याला नायलॉन मांजा न वापरण्याविषयी समजावुन सांगितले पाहिजे व त्याचे दुष्परिणाम आपल्याबरोबरच निसर्गावर देखील होत असून नायलॉन मांजाचा वापर टाळला पाहिजे व वापर करणार्यांवर पोलिसांनी देखील कारवाई केली पाहिजे.
गणपत हाडपे,
मांजरगाव.