नायलॉन मांजा मुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:16 PM2019-01-09T16:16:09+5:302019-01-09T16:17:05+5:30
देशमाने : संक्र ांतीचा सण हा सर्वांच्या आवडीचा .तिळगुळाबरोबर या सणाचा गोडवा वाढतो ते आकाशात उडणाº्या रंगिबरंगी पतंगामुळे . लहानथोरापासून आबालवृद्धापर्यंत पतंग उडवण्याचा आनंद अनुभवला जातो. पण काही वर्षांपासून वापरल्या जाणार्या नायलॉन मांजामुळे या सणाला गालबोट लागत आहे.
देशमाने :
संक्र ांतीचा सण हा सर्वांच्या आवडीचा .तिळगुळाबरोबर या सणाचा गोडवा वाढतो ते आकाशात उडणाº्या रंगिबरंगी पतंगामुळे . लहानथोरापासून आबालवृद्धापर्यंत पतंग उडवण्याचा आनंद अनुभवला जातो. पण काही वर्षांपासून वापरल्या जाणार्या नायलॉन मांजामुळे या सणाला गालबोट लागत आहे. आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांना व पक्ष्यांना याचा फटका बसला आहे. शासनाने नायलॉन मांजावर बंदी आणली असली तरी दरवर्षी हा वापरला जातो व अपघात होत असतात.यासाठी प्राथमिक स्तरापासून प्रबोधन होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळा देशमाने बु. येथील विद्यार्थ्यांनी आज नायलॉन मांजा मुक्तीची शपथ घेतली. सकाळी परिपाठा च्या वेळी अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.नंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी एकित्रतपणे ह्लमी येत्या संक्र ांतीच्या सणाला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणार नाही व इतरांनाही करू देणार नाहीह्व या आशयाची शपथ घेतली . यानंतर मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर उपक्र माचे केंद्रप्रपुख निंबा केदारे व ग्रामस्थांनी स्वागत केले. सदर उपक्र माचे संयोजन दादासाहेब बोराडे, सुनिल मखरे, संजय सोनवणे, श्रीमती मनिषा खैरनार , सुनिता बुवा , धनश्री वडनेरे यांनी केले.