खड्ड्यात हरवला निळवंडी रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:45+5:302021-09-18T04:15:45+5:30
दिंडोरी शहरातील नाशिक कळवण राज्य मार्गाला लागून निळवंडी रस्त्यावर पंचायत समिती कार्यालय असून, या ठिकाणी शासकीय कामानिमित्त रोज राजकीय ...
दिंडोरी शहरातील नाशिक कळवण राज्य मार्गाला लागून निळवंडी रस्त्यावर पंचायत समिती कार्यालय असून, या ठिकाणी शासकीय कामानिमित्त रोज राजकीय व सर्व सामान्य नागरिकांची वर्दळ असते व त्याच प्रमाणे या मार्गावर श्री स्वामी समर्थ केंद्र असल्याने राज्यभरातून भाविक भक्त येत असतात; परंतु तालुक्याचे ठिकाण असलेल्या दिंडोरी शहरातील रस्त्याची ही अवस्था पाहून नाराजी व्यक्त होत आहे. निळवंडी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पायी ये-जा करणारे नागरिक व लगतच्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्याने खड्डे लक्षात येत नसल्याने अनेकदा मोटारसायकलस्वारांचे छोटे-मोठे अपघात याठिकाणी होत आहेत. सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तात्पुरते मुरुम टाकून डागडूजी न करता कायमस्वरूपी नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
फोटो - १७ निलवंडी रोड
दिंडोरी शहरातील निळवंडी रस्त्याची झालेली दुरवस्था.
170921\17nsk_26_17092021_13.jpg
दिंडोरी शहरातील निळवंडी रस्त्याची झालेली दुरावस्था.