निमा विश्वस्त मंडळ दुत्तपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:43 PM2020-10-08T22:43:31+5:302020-10-09T01:16:09+5:30
सातपूर : कोविडमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानुसार निवडणूक समितीने निमाची निवडणूक स्थगित केली आहे असे असतांना उद्योजक मतदानासाठी येऊ शकले असते केवळ सत्ताधाऱ्यांमुळे निवडणूक स्थगित करावी लागली असा बिनबुडाचा दावा विश्वस्त मंडळाने केल्याचा आरोप निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सातपूर : कोविडमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानुसार निवडणूक समितीने निमाची निवडणूक स्थगित केली आहे असे असतांना उद्योजक मतदानासाठी येऊ शकले असते केवळ सत्ताधाऱ्यांमुळे निवडणूक स्थगित करावी लागली असा बिनबुडाचा दावा विश्वस्त मंडळाने केल्याचा आरोप निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
निमात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी सांगितले की, सर्वत्र कोरोनामुळे भीतीचे वातावरण असतांना निवडणूक घेणे शक्य नसल्याने जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार निवडणूक स्थगित करण्यात आली. मात्र निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दुटप्पीपणाची भूमिका घेत निवडणूक घेता आली असती आणि उद्योजक मतदानाला आले असते. केवळ सत्ताधाºयांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक स्थगित करावी लागली असे म्हणणे धमार्दाय उपायुक्तांकडे मांडले तर हेच धनंजय बेळे आयमाचे बोर्ड आॅफ पास्ट प्रेसिडेन्टचे अध्यक्ष असून त्यांनी आयमाची निवडणूक पुढे ढकलली आहे. निमा आणि आयमा या दोन्ही संस्थांवर पदाधिकारी असलेले धनंजय बेळे हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेस श्रीपाद कुलकर्णी, कैलास आहेर, प्रदीप पेशकार, संजय महाजन आदी उपस्थित होते.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निमाच्या वादावर धर्मदाय उपायूक्तांकडे सुनावणी सुरु आहे. सहा आठवड्यात हा वाद मिटविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
दरम्यान, २००८साली पुरनिधीसाठी निमा सभासदांनी १४ लाख २६ हजार २४८ रुपये जमा करण्यात आले होते. हा निधी निमाच्या खात्यात एफडीआर करण्यात आला. हा निधी निमाच्या दैनंदिन कामासाठी वापरु नये असा ठराव असतानाही सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता २०१७ साली एफडीआर मोडून निमाच्या मेक इन नाशिकसाठी वापरण्यात आला होता. २०१८ साली सत्ताबदल झाली असतांना आणि नवीन पदाधिकाºयांना समजू न देता स'ांचा गैरवापर करुन ते पैसे परस्पर बँकेत जमा करण्यात आलेत असे अनेक गैरकारभार मागील दहा वर्षात झालेले असून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव,सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिला आहे.